येत्या 14 फेब्रुवारीला श्री. विठठल अभियांत्रिकीत माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे आयोजन!

पंढरपूर लाईव्ह


गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेषन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये येत्या शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2015 रोजी सकाळी 10 वा.माजी विदयार्थ्यांकरिता ‘ॠणानुबंध 2015’ चे आयोजन केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

‘ॠणानुबंध 2015’या एकदिवसीय माजी विद्यार्थ्यी मेळाव्यात माजी विद्यार्थी हे मनमुराद चर्चा, आपसात सुसंवाद,नव्या विचारांबरोबरच जुन्या आठवणींच्या शिदोरीची देवाण घेवाण करताना नव्या विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्षन व आपल्या नोकरीत येत असलेला अनुभव कथन आदि कार्यक्रम असणार आहेत. महाविद्यालयातर्फे माजी विदयार्थ्यांना भेट वस्तू देऊन सर्व माजी विदयार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. या ‘माजी विद्यार्थी मेळावा’ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरेचे माजी कुलगुरु डॉ. सुभाष आवळे, नॉर्ड, ड्राईव्ह सिस्टीम प्रा.लि.,पुणेचे व्यवस्थापकीय संचालक पी.एल.मुत्तुषेखर तर विषेष अतिथी म्हणून पनामा ग्रुप पुणेचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेष जगदाळे हे उपस्थित राहून मार्गदर्षन करणार आहेत. तसेच संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे, टे्रनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंटचे अधिकारी व माजी विदयार्थी संघटनेचे सचिव डॉ.माधव राऊळ, माजी विदयार्थी संघटनेचे अध्यक्ष अभिजीत नवले यांचेसह इतर पदाधिकारी हे माजी विदयार्थ्यांना मार्गदर्षन करणार आहेत. एकूणच शनिवारचा दिवस जुन्या आठवणींना उजाळा देण्यात, गतकाळात घडलेल्या प्रमुख घटनांचा आढावा घेण्यात येणार आहे.यामध्ये अभियात्रिकंीच्या स्थापनेपासून ते गतवर्षी उत्तीर्ण पर्यतचे विद्यार्थ्यी यात सहभागी होणार आहेत. ‘सा रे ग म’ फेम निलेष जोषी याच्या स्वरसाज मधील ‘मेरी आवाज सुनो’ या संगीतमय कार्यक्रमांने माजी विद्यार्थी मेळावा चे समारोप होईल.
या कार्यक्रमास माजी विदयार्थी संघटनेचे उपाध्यक्ष ओंकार महाजन तसेच संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, उपाध्यक्ष एन.एस.कागदे तसेच सचिव डॉ.रोंगे यांचे श्री विठ्ठल इन्स्टिटयूटच्या व्यवस्थापनातील इतर सहकारी, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग उपस्थितीत राहणार आहेत.
छायाचित्र:-1.संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे.
2.टे्रनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंटचे अधिकारी व माजी विदयार्थी संघटनेचे सचिव डॉ.माधव राऊळ.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

 

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 10 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 52 हजार 428  च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 777 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.


Post a Comment

0 Comments