आर. आर. पाटील यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):-
दि. 7-2-2015

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा)  यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असून आबावर उपचार होत असलेल्या मुंबई येथील लिलावती हाँस्पिटल कडून अधिकृतरित्या अशी माहिती मिळाली आहे.

आज आबांना हाँस्पिटलमध्ये काही काळ स्वतःहून पायी  चालले.  आबांचे हे दर्शन निश्चितच त्यांच्या चाहत्यांसाठी व राष्ट्रवादी पार्टीच्या सर्वांसाठी सुखावह ठरले आहे.
आबांना कर्करोगाचे निदान झाले होते.  लोकसभा निवडणुकीमुळे उपचारास विलंब झाला. मात्र त्यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रीया करण्यात आलेली असुन त्यांनी उपचारास उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत  सुधारणा होत आहे.

Post a Comment

0 Comments