पंढरपूर लाईव्ह शुक्रवार दि. 6 मार्च 2015
पर्थ - एकामागून एक गडी लवकर बाद होत गेल्याने वेस्ट इंडीजचा संघ शंभर धावांमध्ये तंबूत परततो की काय असे वाटत असताना होल्डर व इतर फलंदाजांनी दाखविलेल्या थोड्याशा चिवटपणामुळे विंडीजला 44.2 षटकांमध्ये सर्व गड्यांच्या मोबदल्यात किमान 182 धावांपर्यंत मजल मारता आली.पहिल्या दहा षटकांमध्येच 4 बाद 35 अशी अत्यंत अडखळत सुरवात झालेल्या वेस्ट इंडीजचा डाव गडगडणार हे दिसत होते. कार्टर (66 चेंडूंत 21) आणि डॅरेन सामीने (69 चेंडूंत 26) यांनी मैदानावर टिकून राहत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र विशेष यश आले नाही. भारतीय गोलंदाजांचा बिनचूक मारा आणि चांगल्या क्षेत्ररक्षणापुढे त्यांचा जम बसू शकला नाही. तथापि, होल्डरने 79 चेंडूंत 57 धावा केल्याने संघांची एकूण धावसंख्या किमान दीडशतकी मजल मारू शकली.
विश्वकरंडक स्पर्धेतील भारत विरुद्ध वेस्ट इंडीज सामन्यात वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विजयाची हॅट्रिक केल्यानंतर आज (शुक्रवार) भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्धच्या विजयाचे रंग उधळण्यास सज्ज झाला. दरम्यान वेस्ट इंडीजची धडपडत सुरुवात केली. वेस्ट इंडीजने 25 षटकांत 7 बाद 85 धावा जमविल्या होत्या.
विश्वकरंडकात ब गटात भारताचे पारडे जड झाले असून यापूर्वी पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब आमिरातीविरुद्धचे सामने जिंकून संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. वेस्ट इंडीजने आतापर्यंत चार सामने खेळले असून त्यापैकी दोन सामन्यात यश मिळविले आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून वेस्ट इंडीजलाही ब गटात वर येण्याची संधी आहे. भारतात आज होळीचा सण साजरा असल्याने सार्वजनिक सुटी आहे. त्यामुळे एका बाजूला होळीचा सण साजरा करतानाच भारतीयांना वेस्ट इंडीजविरुद्ध विजयाचा आनंदही साजरा करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
***
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि.6 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 69 हजार 834 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 001 च्या
घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून
यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक
दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...


















0 Comments