पंढरपूर लाईव्ह शुक्रवार दि. 6 मार्च 2015
लंडन - दिल्लीमध्ये 2012 मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेशसिंहची मुलाखत असलेल्या माहितीपटाचे (डॉक्युमेंटरी) बंदीनंतरही बीबीसीने इंग्लंडसह अन्य युरोपियन देशांमध्ये आज प्रसारण केले. बीबीसीने माहितीपट 8 मार्च रोजी प्रसारित करणार असल्याचे सांगितले होते; मात्र या माहितीपटाचे आजच (गुरुवार) प्रसारण केले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने या प्रकरणी आज बीबीसीला नोटीस बजावली आहे. माहितीपटाचे प्रसारण केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा त्यात देण्यात आला आहे.
बीबीसीने तयार केलेली मुलाखत भारतात दाखवू देणार नाही व अशी मुलाखत घेण्यास मनाई करणारा कायदा केला जाईल, असा गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यसभेत केलेला खुलासा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारी फेटाळून लावला होता. राजनाथसिंह यांनी माहितीपट दाखविण्यावर बंदी घातली असतानाही ती प्रसारित करण्यात आली आहे. माहितीपट तयार करणारा लेसली उडविन याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार सुरू आहे, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, राजनाथसिंह म्हणाले, की 24 जुलै 2013 रोजी बीबीसीच्या संबंधित निर्मात्यांना बलात्कारी मुकेश याच्या मुलाखतीची परवानगी मिळाली; मात्र त्यासाठीच्या पूर्वअटींचे पालन निर्मात्यांनी केले नाही. अखेर एप्रिल 2014 मध्ये मुलाखतीचे चित्रीकरण प्रसारणाआधी दाखवून परवानगी घेण्याबाबत कारागृह प्रशासनाने संबंधितांना कायदेशीर नोटीस बजावली. त्या चित्रीकरणात अत्यंत आक्षेपार्ह भाग आला होता. केवळ भारतातच नव्हे, तर कोठेही ही मुलाखत दाखविली जाऊ नये, यासाठी सरकार जागतिक पातळीवर प्रयत्न करत होते.
दरम्यान, बीबीसीने बंदी डावलून माहितीपटाचे प्रसारण केल्याच्या प्रकाराची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी तातडीने बीबीसीला नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर हा माहितीपट अपलोड केलेल्या यू ट्यूबला तो तत्काळ काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे.
व्यावसायिक कारणासाठी या माहितीपटाचा वापर केला जाऊ नये, असा करार झाला होता. आपण या कराराचे उल्लंघन केला आहात त्यामुळे भारत सरकार आपल्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे या नोटिशीत म्हटले आहे. या संदर्भात बोलताना गृह खात्याचा प्रवक्ता म्हणाला, की व्यावसायिक कारणासाठी या माहितीपटाचा वापर करताना त्याबाबतची रीतसर परवानगी केंद्र सरकारकडून घेणे आवश्यक असल्याचा उल्लेख करारात होता. असे असूनही कोणतीही परवानगी न घेता बीबीसीने त्याचे प्रसारण केले आहे. त्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आम्ही आता त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा करत आहोत.
माहितीपट यू ट्यूबवर
नवी दिल्ली - दिल्लीत 2012 मध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेशसिंहची मुलाखत असलेल्या माहिती पटाचा (डॉक्युमेंटरी) व्हिडिओ यू-ट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने घातलेल्या बंदीनंतरही बीबीसीने इंग्लंडसह अन्य युरोपियन देशांमध्ये माहितीपटाचे प्रसारण केले आहे; शिवाय व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या यू-ट्यूब या साइटवर अपलोड करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहून या व्हिडिओवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
इंटरनेटवर व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्हायरल होण्याची शक्यता आहे, यामुळे तत्काळ यूट्यूबवरून काढून टाकावा, असे पोलिसांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
केंद्र सरकारने घातलेल्या बंदीनंतरही बीबीसीने इंग्लंडसह अन्य युरोपियन देशांमध्ये माहितीपटाचे प्रसारण केले आहे; शिवाय व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या यू-ट्यूब या साइटवर अपलोड करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहून या व्हिडिओवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे.
इंटरनेटवर व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्हायरल होण्याची शक्यता आहे, यामुळे तत्काळ यूट्यूबवरून काढून टाकावा, असे पोलिसांनी पत्रामध्ये म्हटले आहे.
माहितीपट हटवला
नवी दिल्ली - दरम्यान, भारत सरकारच्या सूचनेनुसार यूट्यूबवरून इंडियाज डॉटर्स हा माहितीपट हटवण्यात आला; आज दिवसभर या विषयावरून जोरदार चर्चा झाल्यानंतर सरकारने यूट्यूबला हा माहितीपट हटवण्याची सूचना केली होती. त्यानुसार तो हटवण्यात आला, तर तिहार तुरुंग प्रशासनानेही
बीबीसीला नोटीस बजावली आहे.
बीबीसीला नोटीस बजावली आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा हा माहितीपट पाहावा आणि त्यानंतरच कोणताही निर्णय घ्यावा अशी विनंती मी त्यांना करत आहे. भारताच्या प्रतिमेला कोणत्याही प्रकारे धक्का लावण्याचा हेतू या माहितीपट निर्मितीमागे नाही.
- लेसली उडविन, माहितीपट निर्माती
***
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि.6 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 69 हजार 834 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 001 च्या
घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून
यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक
दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...


















0 Comments