भारताचा विजयी चौकार.....!

पंढरपूर लाईव्ह शुक्रवार दि. 6 मार्च 2015

पर्थ : देशभरात आज धुलिवंदनाचा सण साजरा होत असतानाच टीम इंडियानेही वेस्ट इंडिजचा पराभव करुन विजयाचा गुलाल उधळला आहे. भारताने वेस्ट इंडिजवर 4 विकेट्स आणि 65 चेंडू राखून मात केली आणि विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. पर्थच्या वाका स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात अवघ्या 183 धावांचा पाठलाग करताना भारताची चांगलीच तारांबळ उडाली.

विंडीजच्या वेगवान आक्रमणासमोर भारताची अवस्था 6 बाद 134 अशी झाली. पण धोनीने अश्विनच्या साथीनं अर्धशतकी भागिदारी रचून भारताला विजय मिळवून दिला. धोनीने 56 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 45 धावा केल्या, तर अश्विन 16 धावांवर नाबाद राहिला. विराट आणि रहाणेनं तिसर्‍या विकेटसाठी रचलेल्या 43 धावांच्या भागीदारीचाही भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा होता. त्याआधी भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजला 44.2 षटकांत 182 धावांतच गुंडाळलं. जेसन होल्डरच्या 57 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता विंडीजचे बाकीचे फलंदाज साफ अपयशी ठरले. भारताकडून शमीनं सर्वाधिक 3 विकेट्स काढल्या. उमेश यादव आणि जाडेजानं प्रत्येकी दोन तर मोहित आणि अश्विननं एक-एक विकेट काढली.

भारताने यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत तिन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि यूएईच्या संघावर टीम इंडियाने मात केली आहे. त्यामुळे आज धुलिवंदनाच्या दिवशी टीम इंडियाने विजयाचा चौकार मारला आहे.

***

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.6 मार्च  2015 रोजी पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   69 हजार 980 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 015 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









Post a Comment

0 Comments