पंढरपूर लाईव्ह शुक्रवार दि. 6 मार्च 2015दिमापूर:- नागा समुदायाच्या मुलीवर बलात्कार करणार्या नराधमाला संतप्त जनतेनं जेलमधून बाहेर खेचून, त्याची नग्वावस्थेत धिंड काढून, त्याला मरेपर्यंत मारून भर चौकात फासावर लटकवल्याची खळबळजनक घटना दिमापूरमध्ये घडली आहे. या भीषण जनक्षोभामुळे दिमापूरमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असून संचारबंदी लागू करूनही पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणणं कठीण झालंय.
मूळचा बांगलादेशी असलेला आणि आसाममधून नागालँडमध्ये आलेला 35 वर्षीय सय्यद फरीद खान हा सेकंडहँड कारचा व्यवसाय करत होता. 23 फेब्रुवारीला त्यानं नागा समुदायाच्या एका मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणी पोलिसांनी त्याला तातडीनं अटकही केली होती. परंतु, जनतेच्या मनात त्याच्याबद्दल राग धुमसत होता. अटकेनं त्यांचं समाधान झालं नव्हतं. या बलात्कार्याला जन्माची अद्दल घडवायचं नागरिकांनी एकत्र येऊन ठरवलं आणि त्यासाठी कायदाच हातात घेतला.गुरुवारी संध्याकाळी सुमारे 600 जण दिमापूर सेंट्रल जेलवर धडकले. स्थानिक पोलीस आणि तुरुंग रक्षकांना न जुमानता ते जेलमध्ये शिरले. त्यांनी सय्यद फरीद खानला बाहेर काढलं आणि अक्षरशः फरफटतच त्याला शहरभर फिरवलं. त्याला पाहून जनतेच्या संतापाचा इतका उद्रेक झाला होता, की प्रत्येक जण त्याला लाथाबुक्क्यांनी मारत होता. त्याच्या अंगावरचे कपडेही लोकांनी फाडले. या बेदम मारहाणीत आरोपीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला भर चौकात फासावर लटकवण्यात आलं, तेव्हा सगळ्यांचा राग शांत झाला. थरकाप उडवणार्या या घटनेकडे कुणी ’तालिबानी शिक्षा’ म्हणून पाहतंय, तर बलात्कार्यांसाठी हीच शिक्षा योग्य असल्याचं मत काहीजण व्यक्त करताहेत.
दरम्यान, हा जनक्षोभ उसळला असताना पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी लाठीमार आणि हवेत गोळीबार केला. त्यात 20 नागरिक जखमी झाल्याचं कळतं. अजूनही दिमापूर आणि परिसरात संचारबंदी लागू आहे, परंतु त्या चौकातून गर्दी हटायला तयार नाही. या घटनेचे आणखी तीव्र पडसाद उमटू नयेत, यादृष्टीनं नागालँड पोलिसांनी केंद्रीय गृहखात्याकडे अतिरिक्त पोलीस पाठवण्याची आणि लष्कराला सतर्कतेच्या सूचना देण्याचं आवाहन केलंय. तिकडे, आसाममध्येही अॅलर्ट जारी करण्यात आलाय.
***
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि.6 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 69 हजार 990 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 015 च्या
घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून
यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक
दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments