पाकिस्तानमधील हिंदुंनी केली ‘होळी’ उत्साहात साजरी; सुरक्षेसाठी मानवी साखळी

पंढरपूर लाईव्ह शुक्रवार दि. 6 मार्च 2015

इस्लामाबाद : कराचीमध्ये स्वामी नारायण मंदिरात होळी पारंपरिक स्वरुपात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित हिंदू बांधवांच्या सुरक्षेसाठी मानवी साखळी करण्यात आली. एनएसएफच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीचं आयोजन केलं होतं. पाकिस्तानातल्या धार्मिक गटांत परस्परांतील विश्वास आणि सहकार्य यांचं दर्शन घडवण्यासाठी मानवी साखळी करण्यात आली.


मानवी साखळीबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्यात आला होता. धार्मिक सहिष्णुतेबाबत मत प्रदर्शित करण्याची इच्छा असलेल्यांनी सहभागी होण्याचं आवाहन यात करण्यात आलं होतं.
 
हिंदुंच्या मंदिरांचा पावित्र्यभंग, जबरदस्तीने धर्मांतर करणे यासारख्या अनिष्ट प्रथांविरोधात आवाज उठवताना हिंदुंचं संरक्षण करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. जर तुम्ही एखाद्या घटकाच्या हक्कांसाठी आज उभे राहिला नाहीत, तर उद्या तुम्हालाही लक्ष केलं जाऊ शकतं असंही मत व्यक्त केलं गेलं.

*********

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.6 मार्च  2015 रोजी पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   70 हजार 076 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 026 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 










Post a Comment

0 Comments