बांग्लादेश ला 193 धावात गुंडाळले... भारताचा 109 धावांनी विजय... सेमीफायनल मध्ये टीम इंडीयाचा झंझावात दाखल...

पंढरपूर लाईव्ह:-

मुंबई: वर्ल्डकपमध्ये धोनीच्या टीम इंडियाने पुन्हा एकदा विजयाचा ‘मौका’ साधला आहे. भारताने बांगलादेशचा वचपा काढत अवघ्या 193 धावांत खुर्दा उडवला आणि तब्बल 109 धावांनी विजय मिळवला.

 वर्ल्डकपमधील टीम इंडियाचा हा सलग सातवा विजय आहे. तर धोनीच्या नेतृत्त्वातील हा 100 वा विजय आहे. या विजयासह टीम इंडियाने दिमाखात वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.

 टीम इंडियाचा हिट मॅन रोहित शर्माला झुंजार शतकाबद्दल 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार देण्यात आला.


प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने सलामीवीर रोहित शर्माचं धडाकेबाज शतक आणि सुरेश रैनाच्या झुंजार अर्धशतकाच्या जोरावर, बांगलादेशसमोर 303 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.  या आव्हानाचा पाठलाग करताना, बांगलादेशी टीम 45 षटकात 193 धावांत गारद झाली.

 भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक 4, मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. मोहित शर्माला एका विकेटवरच समाधान मानावं लागलं.

****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 19 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   75 हजार 778 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 838 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 


Post a Comment

0 Comments