पंढरपूर लाईव्ह:- विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार भारत भालके यांनी विविध प्रश्ने मांडली. याबाबतचे हे वृत्त..
पंढरपूर ः दि.16 - अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी गुरूवार दि.12.03.2015 रोजी लक्षवेधी नं.1 विचारलेल्या प्रश्नाला मा.ना.श्री दिपक सावंत या मंत्री महोदयांचे उत्तर असमाधानकारक आल्यामुळे सभागृहामध्ये आज सोमवार दि.16.03.2015 रोजी पुन्हा प्रश्न उपस्थित केला.
सध्या महाराष्ट्रामध्ये असलेला स्वाईन फ्ल्यु हा रोग कितव्या जनरेशनचा आहे व स्वाईन फ्ल्युमुळे महाराष्ट्रात अनेक लोक मृत्युमुखी पडतात त्या जनरेशनची लस आपल्याकडे उपलब्ध नाही हे खरे आहे काय? असा प्रश्न आमदार श्री भारत भालके यांनी उपस्थित केला. त्यावरती मंत्री महोदयांनी लस उपलब्ध करून देण्याचे संबंधित विभागाला आदेश देण्याचे आश्वासन दिले.
पंढरपूर ः दि.19 - अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी गुरूवार दि.19.03.2015 रोजी शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्या वसुंधरा पाणलोट योजने अंतर्गत निकृष्ठ दर्जाची कामे करून गैरव्यवहार केले बाबत व अशा निकृष्ठ कामे करून गैरव्यवहार केलेल्या संस्थांना अनेक ग्रामपंचायतीने कामे देऊ नयेत अशा ठरावाच्या प्रती पाठवून देखील काही संस्थांना कामे दिली गेली आहेत ती कामे रद्द करणार का? व ती कामे इतर संस्थांना देणार का? असा प्रश्न सभागृहात विचारला.
त्यावर ग्रामविकास मंत्री महोदया मा.ना पंकजा मुंडे यांनी अशा कामाची चौकशी करून ग्रामपंचायतीचे ठराव आले असल्यास निकृष्ठ दर्जाची कामे करून गैरव्यवहार केलेल्या संस्थांकडून कामे काढून घेतली जातील व ती कामे इतर संस्थांना दिली जातील असे उत्तर दिले.
****************

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8552823399 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 19 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 75 हजार 778 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 838 च्या
घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून
यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक
दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
0 Comments