पंढरपूर लाईव्ह :-
देशी मद्यावरील कररचनेत बदल होणार असल्याने राज्यात देशी दारू तसेच मसाल्याचे पदार्थ महागणार असून एलईडी बल्ब, पर्सेस, कॅन्सरवरील औषधे, वह्या, बेदाणे तसेच देशी या जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या आहेत.
-
18 मार्च : फडणवीस सरकारचा आज पहिला-वहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला. ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाला धक्का न लावता मुनगंटीवार यांनी मोजक्याच्या वस्तूंच्या दरात वाढ केलीये. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्याची अंमलबजावणी करून दाखवली.
पण, दुसरीकडे बजेटमध्येही तळीरामांना चांगलाच दणका देत मद्य उत्पादनावरच्या करात वाढ केलीये.त्यामुळे मद्य आता महागणार आहे. तर दुसरीकडे मसाल्याचे पदार्थही महाग होणार आहे.कर्करोगाशी लढा देणार्यांना आधार देत कर्करोगावरील औषधी स्वस्त केलीये. त्याचबरोबर दिवंगत माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या मागणीची आठवण करून देतबेदाणे आणि मनुकांवरच्या करातली सूट कायम असल्याचं जाहीर केलं.काय होणार स्वस्त - कर्करोगावरील औषधी - वर्क बुक्स, वह्या स्वस्त होणार - एलईडी बल्ब - बेदाणे - मनुके
काय महाग - मद्य - मसाले
मुंबई, दि. १८ - देशी मद्यावरील कररचनेत बदल होणार असल्याने राज्यात देशी दारू तसेच मसाल्याचे पदार्थ महागणार असून एलईडी बल्ब, पर्सेस, कॅन्सरवरील औषधे, वह्या, बेदाणे तसेच देशी या जीवनावश्यक वस्तू स्वस्त झाल्या आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा केली.
देशी दारुच्या उत्पादन शुल्कात २०० टक्के वाढ किंवा १२० रुपये प्रतिलीटर यापैकी जे जास्त असेल त्यात तेवढी वाढ होणार असल्याने देशी मद्य महागणार आहे तर एलईडी बल्बवरील करात कपात करून तो १२.५ टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणल्याने बल्ब स्वस्त होणार आहे. याशिवाय कॅन्सरवरील औषधेही स्वस्त होणार असल्याने रुग्णांना तर प्रयोगशाळा वही,आलेख वही, चित्रकला वही, वही, आराखडा वही करमुक्त केल्याने त्याही स्वस्त होणार आहेत. याशिवाय हॅन्डबॅग्ज, देशी व व्हाईट खारी बटर, बेदाणे या वस्तूही स्वस्त होणार.
****************

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8552823399 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 18 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 75 हजार 492 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 793 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.


.jpg)




0 Comments