पंढरपूरकरांचा सभेच्या प्रसाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
पंढरपूर, १८ फेब्रुवारी ( वार्ता.) - हिंदु मावळ्यांनी भगवी पताका घेऊन पाच जुलमी इस्लामी राजवटा धुळीस मिळवून हिंदवी स्वराज्य स्थापन केल्याचा गौरवशाली इतिहास आपल्याला लाभला आहे. तोच वारसा पुढे चालवण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे अशी माहिती समितीच्या सौ. अलका व्हनमारे यांनी दिली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सावरकर पथ येथील सावरकर वाचनालय येथे काल सकाळी ११ वाजता घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला अधि.निलेश सांगोलकर, ह.भ.प. वीर महाराज आदि मान्यवर उपस्थित होते. सौ. व्हनमारे पुढे म्हणाल्या, आत्तापर्यंत १३ राज्यांमध्ये १००० यशस्वी हिंंदु धर्मजागृती सभा घेण्यातआल्या आहेत. नुकतीच करमळी, गोवा येथे १००० वी हिंदू धर्मजागृती सभा उत्साहातपार पडली. याच पध्दतीने बुधवार, २५ मार्च २०१५ यादिवशी पंढरपूर येथील टिळक स्मारक मंदिराचे मैदान येथे सायंकाळी ५.३० यावेळी ही सभा होणार आहे.
पंढरपूर शहरातील ही २ री मोठी सभा आहे. गजानन महाराज मठात झालेल्या मागील हिंदु धर्मजागृती सभेला हजारोंच्या संख्येने हिंदू उपस्थिती होते. सभेच्या प्रसारासाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकत्र्यांच्या जोडीला हिंदुत्वनिष्ठही प्रयत्न करत आहेत. विविध माध्यमातून होणार्या धर्मसभेच्या प्रसाराला पंढरपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे.
गोहत्या, जिहादी आतंकवाद ,धर्मांतर, लव्ह जिहाद, मंदिरांचे सरकारीकरण, हिंदू विरोधी कायदे आणि हिंदूंच्याच सणाला होणार्या दंगली यासारख्या समस्यांनी भारतभरातील हिंदू त्रस्त झाले आहेत. त्या विरोधात हिंदूंना संघटीत करण्यासाठी समितीच्या वतीने धर्मजागृती सभांचे आयोजन केले जाते. या सभांमुळे अनेक युवकांकडून व्यसनाचा त्याग व धर्मपालनास आरंभ झाला आहे. काही गावांत हिंदूचे गट एकमेकांतील मतभेद
त्यागून एकत्र आले आहेत. अनेक धर्मप्रेमी व हिंदुत्वनिष्ठ संघटना धर्मरक्षणार्थ संघटीतझाल्या आहेत. देवतांचे विडंबन, लव्ह जिहाद, धर्मविरोधी कायदे, गोहत्या भ्रष्टाचार,राज्यकत्र्यांचा धर्मद्रोह आदिंविरोधात हिंदू जागृत झाले आहेत. या धर्मजागृती सभेचा िप्रसार पुढील प्रकारे करण्यात येत आहे – घरोघरी जाऊन लोकांना धर्मसभेची माहिती देणे आणि कोपरा सभा घेणे, शिववंदनागटांतील धर्माभिमानी युवक, तरुण मंडळांमधील कार्यकर्ते, महाविद्यालये, शाळा येथील युवक, मंदिरे, बचतगट, भजनी मंडळे, वसतीगृहे, अभ्यासिका, दुकाने, आस्थापने आदी २५० हून अनेक ठिकाणी उपस्थित असणार्या सहस्त्रो धर्माभिमान्यांपर्यंत हिंदुत्व अन् धर्माfशक्षण यांची आवश्यकता सांगून संघटित करणे आदी माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. विविध गटांना प्रबोधनपर ध्वनीचित्रचकत्या दाखवल्या जात असून सार्वजनिकठिकाणी फलक लिहीणे, रिक्शांवर धर्मसभेचे निमंत्रणाचे पत्रक लावणे, चौकाचौकांमध्ये होर्डिंग लावणे, मेगाफोनद्वारे उद्घोषणा करणे आदी नानाविध माध्यमातून धर्मजागृती सभेची आवश्यकता आणि महत्त्व यांविषयी अवगत करण्यात येत आहे. आतापर्यंत भित्तीपत्रके आणि हस्तपत्रके वितरीत करण्यात आली आहेत. फेसबूक, ई-मेल, व्हॉटस्अप, लघुसंदेश यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर 'ऑनलाईन' प्रसार करण्यात येत आहे. धर्मसभेच्या प्रसाराला सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून अनेक ठिकाणी धर्माfशक्षण वर्ग सुरु करण्याची मागणी समाजातून होत आहे. सभास्थळी धर्र्माfशक्षणविषयक, तसेच हिंदूंवर होणार्या अन्यायाची माहिती देणारे भव्य प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. ह.भ.प. वीर महाराज म्हणाले, आज धर्म संकटात असून सर्वांनी जात, पात, पक्ष, संप्रदाय हे विसरून हिंदू म्हणून एकत्र येऊन धर्मसभा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारण धर्म टिकला तर संप्रदाय टिकेल हे सर्व वारकर्यांनी लक्षात घेऊन या सभेला सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन वीर महाराज यांनी शेवटी केले. अधि. निलेश सांगोलकर म्हणाले, मंदिर सरकारीकरणाच्या माध्यमातून हिंदूंच्या मंदिरातील पैसा शासन हस्तक्षेप करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करत आहे. या सभेच्या माध्यमातून हा कायदा रहीत करण्याची मागणी समस्त हिंदु बांधव करणार आहेत. या पत्रकार परिषदेला १६ पत्रकार उपस्थित होते.
छायाचित्र ओळ - उजवीकडून अधि. निलेश सांगोलकर, सौ. अलका व्हनमारे,
ह.भ.प. वीर महाराज
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *



.jpg)





0 Comments