‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 75 हजाराहून अधिक

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):-

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. अनेकांनी कॉल करुन, मेल करुन  व वेगवेगळ्या माध्यमातून आमच्याशी संपर्क साधला. आमच्या या उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले. काहिंनी मार्गदर्शक सुचना केल्या. यानुसार आम्ही वेळोवेळी या अ‍ॅप मध्ये आवश्यक ते सर्व बदल केले. जास्तीत जास्त अद्ययावत आणि सर्वांना उपयुक्त पडेल अशी माहिती याद्वारे देण्याचा आमचा प्रयत्न राहिला आहे. तो यापुढेही असाच राहिल.

‘पंढरपूर लाईव्ह’ चे संपादक भगवान वानखेडे यांचा पत्रकारितेतील अनेक वर्षापासूनचा अनुभव, वेगवेगळ्या घटकातील प्रतिभावंतांचा त्यांचा सहवास तसेच विविध क्षेत्राबाबतचा त्यांचा गाढा अभ्यास, पत्रकारितेचा व्यासंग आणि त्यांनी अविश्रांत, अथकपणे प्रतिकुल परिस्थितीतही ‘पंढरपूर लाईव्ह’ या पंढरपूरच्या पहिल्या ई-न्यज  वेब पोर्टल च्या प्रसिध्दीसाठी केलेले प्रयत्न या सर्व  बाबी या अ‍ॅप ला सर्वदुर पोहचविण्यासाठी कारणीभुत आहेत.  ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

आज दि. 17 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 75 हजाराहून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 6717 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.  दिवसेंदिवस  ‘पंढरपूर लाईव्ह’  ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहेच. मात्र याबरोबरच या द्वारे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आम्ही करणार असल्याची माहिती संपादक भगवान वानखेडे यांनी दिली.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 17 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   75 हजार 36 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 721 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 




Post a Comment

0 Comments