पंढरीच्या महर्षी वाल्मिक संघाने केले ‘दादा कोंडके’ यांचे पुण्यस्मरण...

मराठी चित्रपट क्षेत्रातील ‘बावन्नकशी सोनं’ असणारे शाहिर दादा कोंडके म्हणजे मराठी सिनेमांचा आत्मा... ज्यांच्या नावाशिवाय मराठी सिनेसृष्टी अधुरी आहे... ज्यांच्या एका-एका संवादफेकीवर सिनेरसिक अख्खे सिनेमा गृह डोक्यावर दणाणुन सोडत... ज्यांच्या  पडद्यावरील आगमनाबरोबरच हवेत फेटे फेकले जायचे...

ज्यांच्या गाण्यांच्या ठेक्यावर संपुर्ण टॉकीज डोलायचे... ज्यांच्या ‘च्या मायला तिच्या’ या संवादाला सुध्दा भरभरुन दाद मिळायची... सिनेरसिकांच्या हृदयसिंहासनावर राज्य करणारा हा सोंगाड्या एक दिवस अकस्मात आम्हातून निघुन गेला... सर्वांना त्यांची ही एक्झीट चटका लावुन गेली... मात्र तरीसुध्दा आज  ‘दादा कोंडके’ आपल्यात नाहीत...यावर विश्‍वासच बसत नाही.. कांही अंशी हे खरे सुध्दा आहे.. कारण आज दादा त्यांच्या अजरामर बनलेल्या शेकडो सिनेमांच्या रुपात जीवंतच आहेत... दादांचे चाहते तसे अवघ्या महाराष्ट्रात आहेत. मात्र त्यांची आठवण क्षणोक्षणी जपलेल्या पंढरपूरातील दादांच्या चाहत्यांनी आज पंढरीत त्यांची 17 वी पुण्यतिथी त्यांच्या आठवणींना उजाळा देत साजरी केली... येथील महर्षी वाल्मिक संघाने हे पुण्यस्मरण केले. महर्षी वाल्मिक संघच्या वतीने वर्षभरात वेगवेगळे उपक्रम आपल्या सामाजिक कार्याचा हा वसा अविरत चालु ठेवलेला आहे. नागरिकांच्या व वारकर्‍यांच्या विविध समस्यांवर वेळोवेळी आंदोलने व इतर मार्गाने तोडगा काढण्याचे काम महर्षी वाल्मिक संघाने केलेले आहे. आज शाहिर दादा कोंडके यांचे केलेल्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे स्व.शाहीर दादा कोंडके यांच्या 17  पुण्यतिथी निमित्त अ.भा.महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.

   स्व.शाहीर दादा कोंडके यांच्या प्रत्येक चित्रपटाने सुवर्ण महोत्सव साजरा केला असुन त्यांची गिनीजबुकात नोंद झालेले पहिले चित्रपट निर्माते म्हणुन ते ओळखले जातात.दादा कोंडके यांचा चित्रपट म्हणजे मराठी रसिकांना एक विनोदात्मक व प्रबोधनात्मक चित्रपट पाहर्‍याची अशा या हरहुन्नरी कलाकाराची 17 वी पुण्यतिथी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने वाल्मिकी भवन येथे साजरी करण्यात आली.

     स्व,दादा कोंडके यांचे पंढरपूरशीही अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते. ‘एकटा जिव’ या त्यांच्या आत्मचरित्रामध्येही त्यांनी पंढरपूरचा उल्लेख केल्याचे दिसुन येते.पंढरपूकरांनीही त्यांच्या आठवणी जोपासल्या असुन महर्षी वाल्मिकी संघाने आज त्यांचे पुण्यस्मरण केले. यावेळी अभंगराव बुवा, बापु सावंतराव, प्रशांत माने, दिनेश अभंगराव, सोमनाथ कोळी, सोमा अभंगराव, किशोर सुरवसे, भारत कोळी, चेतन नेतहराव, दादा ननवरे, सागर पांढरे, स्वप्निल शिरसट, लखन अभंगराव, आकाश माने, मंगेश मुसळे, श्रीकांत ननवरे, धिरज करकमकर, जालींदर करकमकर, विशाल वाघमारे, पुंडलीक अधटराव, जयवंत अभंगराव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 15 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   74 हजार 493 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 641 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 






Post a Comment

0 Comments