मतदार याद्या शुध्दिकरण व अद्यावतीकरण कार्यक्रम

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर दि.14:- मतदार यादीतील त्रुटी दुर करण्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार यादी शुध्दिकरण व अद्यावतीकरण कार्यक्रम हाती घेतला आहे. हा कार्यक्रम तालुक्यात 3 मार्च ते 31 जुलै 2015 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा प्र.तहसिलदार  मारुतराव मोरे यांनी दिली.


या कार्यक्रमांतर्गत मतदार छायाचित्र ओळखपत्र (EPIC) आधार कार्ड  (UIDAI) बरोबर जोडले जाणार आहे. तसेच या मोहिमेअंतर्गत मतदार यादी दुरूस्ती, मतदार ओळखपत्र, मतदार यादीत मतदारांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीचा समावेश करण्यात येणार. या बाबतची माहिती जवळच्या ई महासेवा केंद्र, मतदार  मदत केंद्र, नागरी सेवा केंद्र तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे देण्यात यावी. जास्तीत जास्त मतदारांना आधार क्रमांक द्यावा, यासाठी राजकीय पक्षांची प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली असून, प्रत्येक राजकीय पक्षामार्फत मतदान केंद्रावर बी.एल.ए. (बुथ लेव्हल असिस्टंट) नेमण्यात येणार आहे.

बोगस मतदानाला आळा बसावा. निवडणुकीसाठी अचूक मतदार यादी असावी. यासाठी निवडणूक आयोगाने ही मोहीम हाती घेतली आहे.मतदार यादी दुरुस्तीसाठी मतदार संघामध्ये दिनांक 12 एप्रिल 2015 रोजी विशेष शिबीराचे आयोजन केले  असल्याचेही सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा प्र.तहसिलदार मोरे यांनी सांगितले.

****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 14 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   74 हजार 041 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 566 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 





Post a Comment

0 Comments