युवक मराठा महासंघाच्या मंगळवेढा तालुक्यात मारापूर व घरलिंगी येथे शाखांचे उद्घाटन

पंढरपूर लाईव्ह

(प्रतिनिधी)- अखिल भारतीय युवक मराठा महासंघ सोलापूर जिल्हा यांच्या वतीने गुरूवार दि.12 मार्च 2015 रोजी मंगळवेढा तालुक्यातील मारापूर व घरलिंगी येथे शाखांचे उद्घाटन युवक मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरज भोसले यांच्याहस्ते करण्यात आले.


यावेळी बोलताना सुरज भोसले म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून त्यासाठी युवक मराठा महासंघाच्या जास्तीत जास्त शाखा स्थापन करून सदस्य नोंदणी करत सर्व बहुजन  युवकांना एकत्र आणण्यासाठी युवक मराठा महासंघाची स्थापना झालेली असून कै.आण्णासाहेब पाटील यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवून त्यांचे विचार कृतीत आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी मारापूरचे सरपंच विनायक यादव, दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन भुजंगदादा आसबे,  मारापूर नुतन शाखाध्यक्ष बालाजी यादव, शाखा उपाध्यक्ष सुब्राव यादव, सचिव अक्षय मांडवे, खजिनदार महेश यादव,
सचिन (बंडू)माने, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेबयादव, सिध्देश्‍वर यादव, घरलिंगी नुतन शाखाध्यक्ष विशाल मोरे, उपाध्यक्ष कांतीनाथ लेंडवे, खजिनदार अनिल इंगळे, सचिव नानासाहेब भुसे, सदस्य लखन मोरे, शरद
पवार, भगवान भुसे, आबासाहेब क्षिरसागर, तानाजी मोरे, समाधान मोरे, हैदर मुलाणी, आबा भुसे,  बापू मोरे, महेश मोरे, विलास भुसे आदि उपस्थित होते.

यावेळी मंगळवेढा तालुका उपाध्यक्ष विजय किसन पवार यांची नव्याने नियुक्ती करण्यात आलेली आहे व
पुढील कार्यास शुभेच्छा सर्वजणांनी दिल्या. यावेळी पंढरपूर तालुकाध्यक्ष सुमित शिंदे, सचिव नागनाथ
आवताडे, जिल्हा सरचिटणीस प्रशांत गुटाळ, विश्‍वजीत भोसले, रोहित शिंदे, गोट्या माने आदि उपस्थित होते.

****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 14 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   74 हजार 041 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 566 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 




Post a Comment

0 Comments