* उग्र आंदोलन छेडण्याचा अरुण कोळी यांचा इशारा *
पंढरपूर लाईव्ह
राज्यात सद्या सर्वत्र सुरु असलेले वाळू माफीयांचे थैमान रोखण्यासाठी महसुल व गृहविभागाने तातडीने पावले उचलने गरजेचे झाले असुन लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवर हल्ला करण्यापर्यंत मजल या अवैध वाळुमाफींची झाली असुन शासनाने वेळीच यास आवर घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी आदिवासी कोळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुणभाऊ कोळी यांनी प्रांताधिकारी संजय तेली यांच्याकडे दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार तुकाराम मुंढे यांनी स्विकारल्यापासुन अतिशय धडाडीने विविध अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याचे सत्र आरंभले आहे.तर शासकिय कर्तव्यात कसुर करणार्या अनेक अधिकार्यांना व कर्मचार्यांना वठणीवर आणण्याचे कामही त्यांनी केले आहे.मात्र याचवेळी सोलापूर जिल्हात अवैध वाळुमाफीयांनी मोठ्या प्रमाणात डोके वर काढले असुन अधिकृतपणे वाळु ठेका घेतलेल्या काही वाळुसाठ्याच्या ठिकाणीही शासकिय नियमांना धाब्यावर बसवुन रांत्रदिवस यांत्रीक बोटीच्या सहाय्याने वाळु उपसा सुरु आहे. महसुल प्रशासनातील अनेकांचे यात लागेबांधे असल्याने या वाळुमाफीयांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. पंढरपूर तालुक्यातील पोहरगाव येथे चोरट्या वाळू वाहतुकीस विरोध केल्यामुळे एका युवकास आपला प्राण गमवावा लागला आहे. तर पंढरपूर तालुक्यातील त.शेटफळ येथे माण नदीच्या पात्रातून रात्रंदिवस जेसीबीच्या सहाय्याने अवैध वाळु उपसा केला जात आहे. तरी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी आपल्या शैलीने अवैध वाळु उपसा 8 दिवसात रोखावा अन्यथा आदिवसी कोळी महासंघातर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा अरुणभाऊ कोळी यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
हे निवेदन देताना शहराध्यक्ष विशाल करकमकर,नागेश नेहतराव,विशाल अभंगराव,संतोष नेहतराव,अजय कडलासकर,विठ्ठल माने,भारत नवले,बंडु ताड,दत्ता यादव यांच्यासह अदिवासी कोळी महासंघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.



.jpg)





0 Comments