पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर:-गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेषन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटच्या मुलांच्या व मुलींच्या वसतिगृहांमध्ये उत्साहात रंगपंचमी साजरी झाली. महाराष्ट्रातील सर्व जिल्हयातून तसेच विविध राज्यातून अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी या ठिकाणी राहतात परंतु त्यांना रंगपंचमीच्या एका दिवसासाठी आपल्या गावी अथवा आपल्या घरी जाता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांंना रंगपंचमीचा आनंद लुटता येत नव्हता. संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या सुचनेनुसार विद्यार्थी व विद्यार्थीनींना आपआपल्या वसतिगृहातच रंगपंचमी खेळण्यासाठी मुभा दिली. त्यानुसार विद्यार्थ्यांंनी षिस्तिीला बाधा न आणता उत्साहपूर्ण वातावरणात आपआपसात रंगपंचमी साजरी केेली.
मुलांनी मुलांच्या वसतिगृहात व डिप्लोमा पॉलीटेक्निकलच्या आवारात एकमेकांना रंग लावत रंगपंचमी साजरी केली तर विद्यार्थीनींनी मुलींच्या वसतिगृहाच्या आवारातच एकमेकांना रंग लावत होत्या. या दोन्हीही ठिकाणी वसतिगृह व्यवस्थापक प्रा.एम.एम.पवार यांच्या नेतृत्वाखाली मुलींच्या वसतिगृहात द्रोपदी षेळके, गंगेकर, तेरकर व मुलांच्या वसतिगृहात श्रीकांत पवार यांच्यासह षिक्षकेतर कर्मचारी यांनी रंगपंचमी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. या व असे सण साजरे करण्याच्या उपक्रमांमुळे स्वेरीतील विद्यार्थ्यांंंमधून सामाजिक बांधीलकी व एकोपा जपण्याची रुढी दिसून येत होती. राज्याबाहेरच्या विद्यार्थी विद्यार्थीनींनी रंगपंचमीतील उत्साह पाहून असा आनंदोत्सव आमच्या घरीदेखील साजरा होत नसल्याची कबुलीही दिली.छायाचित्र:- रंगपंचमी खेळताना विद्यार्थी.



.jpg)

0 Comments