सुनील पाटील याच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथतुला व ग्रंथभेट

पंढरपूर लाईव्ह

प्रिन्स सुनील पाटील याच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या ग्रंथतुलेमधील विविध विषयावरील पुस्तके नगरपरिषदेच्या शाळांना सस्नेह भेट दिली जाणार आहेत.
समारंभाचे अध्यक्ष मा. श्री. आबासाहेब सूर्यवंशी (माजी शिक्षणाधिकारी)

प्रमुख पाहुणे मा. श्री. राजकुमार पाटील (सभापती - नगरपालिका शिक्षण मंडळ)
मा. श्री. राजेश मालू (उपसभापती - नगरपालिका शिक्षण मंडळ)
मा. श्री. चंद्रकांत रामचंद्र झेले (सामाजिक कार्यकर्ते)
मा. श्री. व्ही. ए. कांबळे (प्रशासन अधिकारी - शिक्षण मंडळ) 
पुष्पगुच्छ व हार देऊन वाढदिवसाला शुभेच्छा दिल्या जातात मात्र हे पुष्पगुच्छ दुस-या दिवशी कचरा म्हणून फेकून द्यावे लागतात. त्यामुळे पुष्पगुच्छाऐवजी चांगली पुस्तके भेट म्हणून द्यावीत... सदर समारंभासाठी येणा-या सर्व पाहुण्यांना नम्र विनंती करण्यात येते की, प्लास्टिकच्या वस्तू, चायना मेड खेळणी, तसेच आरोग्य आणि पर्यावरणास घातक ठरणा-या भेटवस्तू आणू नयेत... वाढदिवसाची भेट द्यायचीच असेल तर ती पुस्तकरूपाने द्यावी जेणेकरून भविष्यात ती पुस्तके अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांना भेट म्हणून देता येतील...

दुरचित्रवाहिनी तसेच संगणकाच्या या युगात वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगली पुस्तके वाचायला मिळावी या उदात्त हेतूने समाजातील विविध व्यक्तींच्या वाढदिवस वा तत्सम निमित्ताने त्यांची ग्रंथतुला करून वाचनप्रेमींना अथवा  सार्वजनिक वाचनालयांना ग्रंथदान करण्याची प्रथा सर्वत्र पडावी यासाठी प्रायोगिक तत्वावर हा लहानसा प्रयत्न आम्ही करत आहोत...

ज्या व्यक्तीची ग्रंथतुला होत आहे त्याच्यासाठीसुद्धा ही गौरवाची बाब आहे. या ग्रंथांचा / पुस्तकांचा उपयोग विद्यार्थ्यांना निश्चितच होईल यात आम्हांला तिळमात्र शंका नाही. ग्रंथतुला हा प्रसंगचं अवर्णनीय असतो, ज्या व्यक्तीची ग्रंथतुला होते त्यांच्यासाठी आणि जे ही ग्रंथतुला घडवून आणतात त्या सर्वांसाठी. या कार्यक्रमाचे संयोजक या नात्याने आम्हांला हा आनंद आपल्या उपस्थितीत घ्यायला आवडेल...


निमंत्रक: बी. बी. गुरव, डॉ. सुनिल पाटील, डॉ. कुमार पाटील, राज धुदाट

वेळ: सकाळी 09:00 वाजता        शनिवार, दिनांक 14 मार्च 2015
स्थळ: नगरपरिषदेची शाळा क्र.1, जयसिंगपूर, जिल्हा - कोल्हापूर

*****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 11 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   72 हजार 971 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 418 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments