आबांचा वारसदार कोण? तासगावची पोटनिवडणूक

पंढरपूर लाईव्ह

सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. येत्या २४ मार्च ही अर्ज दाखल करण्याची शेवटची  तारीख आहे. या निवडणुकीसाठी ११ एप्रिलला मतदान आणि १५ एप्रिलला निकाल असणार आहे.


या जागेवर आर आर पाटील यांच्या पत्नी निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  म्हणून निवडणूक जाहीर होताच आबांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यापूर्वी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेस नेते प्रतीक पाटील यांनी पक्षश्रेष्टींकडे विनंती केली आहे.

कारण भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पोटनिवडणुकीत उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे तासगावमध्ये आबांच्या घरातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळाली, तर भाजप राष्ट्रवादीच्या निर्णयाची परतफेड करणार का?, याकडे तासगाव मतदार संघाचं लक्ष लागून आहे.

*****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 11 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   72 हजार 971 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 418 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments