श्री विठ्ठलाची आरंभीची पूजा प्रा.डोळ यांच्या हस्ते

पंढरपूर लाईव्ह

महाराष्ट्राची दक्षिण काशी व वारकर्‍यांचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाची नव्यानेच सुरु झालेली नित्यपूजा सेवा आरंभ पंढरपुरातील विठ्ठलभक्त प्रा. अशोक डोळ व परिवाराच्यावतीने करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे सदस्य प्रा.जयंत भंडारे, व्यवस्थापक विलास महाजन, हणमंत ताठे उपस्थित होती.

आपल्या लाडक्या देवची पूजा व सेवा आपल्या हातून व्हावी अशी मनिषा प्रत्येक भक्ताची असे. म्हणून तो आपल्या आराध्य देवतीचे विविध प्रकारची पूजा व सेवा करीत असतो. अशीच श्री विठ्ठलाची पाद्यपुजा, तुळशी पुजा व महापुजा केली जाते. पण महापुजेवेळी वापरण्यात येणारे दही-दूध, अभिषेकाने होणारी मुर्तीची झीज रोखण्यासाठी तज्ञांच्या सल्ल्यानुसार श्री विठ्ठलाची महापुजा बंद करण्यात आली. त्यामुळे भाविकांना होणारा आनंद गोठला होता. पुजासेवेचा आनंद भाविकांना मिळावा या उदात्त हेतूने अध्यक्ष अण्णासाहेब डांगे व सदस्यांनी मंदिर समितीच्या बैठकीत नव्याने निर्णय घेवून काही नियम व अटीवर नित्यपुजा सेवेत केशरपानी अभिषेकास परवानगी दिली. त्यामुळे विठ्ठलभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर नित्यपूजा पूर्वी संबंधीत पुजारी, बडवे व सेवाधार्‍यांमार्ङ्गत होत असे. जानेवारी 2014 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर समितीने प्राप्त झालेल्या नियमांच्या आधिन राहून नित्यपूजेसाठी नव्याने पुजारी, सेवाधारी नियुक्त केले. पण यातून पुजेचा आनंद विठ्ठलभक्तांना मिळणार नव्हता. तेव्हा या नव्या निर्णयानुसार भाविकास नित्यपूजेत केशरपानी असल्याने भाविकांना पूजेचा आनंद घेता येणार आहे. या नित्यपुजा सेवेचा आरंभ विठ्ठलभक्त प्रा. अशोक डोळ यांच्या परिवाराच्यावतीने करण्यात आली. मंदिर परिसरात असल्याने पहाटे काकडा आरती, नित्यपूजा याचा बालपणापासनच छंद होता. श्री विठ्ठलाची नित्यपूजा करण्याचा मान आपणास मिळाला असल्याचे प्रा.डोळ यांनी सांगितले.

*****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 11 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   72 हजार 971 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 418 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

 


Post a Comment

0 Comments