पंढरपूर लाईव्ह
सोलापूर वृत्त
ऑफिस बॉयच्या नावे माहिती अधिकाराखाली मागितलेली माहिती देण्याबद्दल, महापालिकेच्या कर आकारणी व संकलन खात्याकडील जे आर. फुटाणे नामक कर्मचार्यांने असर्मथता दाखवल्याबद्दल चिडलेल्या बिल्डर शैलेश करवा यांनी या संबंधित कर्मचार्याच्या कानाखाली आवाज काढला. दरम्यान या प्रकरणी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने, ‘खाकी’ वर्दीने बिल्डर करवा यांना ताब्यात घेवून त्यांची महापालिकेतून सदर बझार पोलीस ठाण्याकडे वरात काढली.
‘खाकी’ वर्दीकडून नियम पायदळी
मारहाण प्रकरणातील आरोपी बिल्डर करवा यांना ताब्यात घेण्यासाठी सदर बझार पोलीस ठाण्याचे कर्मचारी बनसोडे आणि अन्य त्यांचे एक सहकारी आले होते. येताना त्यांनी एक मोटार सायकल आणली होती. त्याच मोटार सायकल वर करवा यांना घेवून महापालिकेतून ते निघून गेले. यावेळी त्यांनी दुचाकीवर ’टीब्बल’ शीट बसण्याचा नियम तोडला. अगोदर इतरांच्या नावे असलेली माहिती न दिल्याबद्दल करवा यांनी मारहाण करून कायदा हातात घेतला आणि याच प्रकरणाचे अनुषंगाने, बनसोडे आणि त्यांचे सहकारी यांनी वाहतुकीचा नियम पायदळी तुडवला. महापालिकेच्या सीसीटीव्ही कॅमेर्यात हे चित्र कैद झाले आहे.
संजीव महादेवसा बिद्री घर नंबर 102 भवानी पेठ या गृहस्थाच्या मिळकतीची माहिती राजू श्रीनिवास कुरापाटी बी -11 दमाणी कॉम्पलेक्स् यांनी पालिकेच्या कर आकारणी व संकलन कार्यालयाकडे मागितली होती. तथापि बिद्री यांनी आपल्या मिळकतीची माहिती कुरापाटी यांना देण्यात येवू नये, असे सांगितले होते. त्यामुळे कर आकारणी व संकलन कार्यालयातील वसूली निरीक्षक जे. आर.फुटाणे यांनी माहिती देण्यास कुरापाटी यांना नकार दिला होता.
त्यावर कुरापाटी हे आपल्याकडे ऑफिस बॉय म्हणून काम करतात. त्यांनी माहिती अधिकाराखाली मागितलेली माहिती का देत नाहीत, अशी विचारणा बिल्डर करवा यांनी शुक्रवारी सायंकाळी फुटाणे यांच्याकडे करत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. अशातच इतरानी मागितलेली माहिती देत येत नसल्याचे फुटाणे यांनी सांगितल्यानंतर करवा यांनी त्यांना मारहाण केली.
या घटनेची माहिती मिळताच महापालिका कामगार संघटना कृती समितीचे अशोक जानराव, प्रदीप जोशी, विजय कांबळे, तेजेस्विनी क्षीरसागर तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनचे अध्यक्ष भारत वडावराव यांच्यासह पदाधिकारी कर आकारणी व संकलन खात्याच्या अधीक्षीका चंद्रभागाई बिराजदार यांच्या कक्षात धावले. यावेळी बिल्डर करवा यांना या प्रकरणी जाब विचारण्यात आला. पुढच्या काही वेळात सामान्य प्रशासन खात्याच्या सहाय्यक आयुक्त अमिता दगडे - पाटील तेथे आल्या. तो पर्यंत सदर बझार पोलीस ठाण्याला कळवण्यात आले होते. येथे पोलीस दाखल झाले आणि त्यांनी बिल्डर करवा यांना ताब्यात घेवून आपला मोर्चा पोलीस ठाण्याकडे वळवला.सीसीटीव्ही फुटेज देवून फिर्याद देण्याच्या सूचना
कर्मचार्याला झालेल्या मारहाण प्रकरणी सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज पोलीस ठाण्यात देवून या प्रकरणी करवा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना सहा.आयुक्त दगडे - पाटील यांनी दिल्या.
*******************
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 10 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 72 हजार 594 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 377 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...




.jpg)














0 Comments