पंढरपूर लाईव्ह
सोलापूर वृत्त
सोलापूर : जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सोमवारी सर्व कर्मचारी, खातेप्रमुख आणि उपजिल्हाधिकार्यांची एकत्रित बैठक बोलावून कारकुनापासून ते उपजिल्हाधिकार्यांपर्यंत सर्वांनाच फैलावर घेतले. यावेळी मुंढेंनी कोणाचाच मुलाहिजा ठेवला नाही. मात्र यावेळी कामचुकारपणा करणार्यांना ज्या पध्दतीने जिल्हाधिकार्यांनी समज दिली यावरुन त्यांच्या ‘रोख-ठोक स्वभावाचे दर्शन मात्र घडले.
तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी पदावर रुजू झालेल्या मुंढे यांनी जिल्हा प्रशासन, तहसील कार्यालय, नगरपालिकांमध्ये आमूलाग्र बदल केला आहे. त्यांच्या कामाची आणि बैठकांचीच चर्चा दिवसभर असते. गुरुवारी त्यांनी जिल्हाधिकारी परिसरातील विविध कार्यालयांची स्वत: तपासणी केली होती. त्यानंतर विविध अधिकार्यांना एकमेकांची कार्यालये तपासून सोमवारी अहवाल देण्याचा आदेश दिला होता. त्या अहवालाच्या आधारे सोमवारी सायंकाळी सहा वाजता कर्मचारी आणि अधिकार्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केली होती. यावेळी नगरविकास, सामान्य प्रशासन, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा, मुद्रांक शुल्क, ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी, खातेप्रमुख, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकार्यांसह सर्व तहसीलदार उपस्थित होते.सर्वांच्या समोर जिल्हाधिकार्यांनी कर्मचारीनिहाय कामातील त्रुटी आणि त्यांच्या कामाची पद्धत याची हजेरी घेतली. त्यांना खडेबोल सुनावले. एवढेच नव्हे तर उपजिल्हाधिकार्यांना देखील सर्वांसमक्ष फैलावर घेतले. योजनांची माहिती नाही, बेसिक गोष्टींची माहिती नाही, कूळ किती याची माहिती सांगता येत नाही, गट किती याची माहिती सांगता येत नाही, जॉब चार्ट नाही आदी अनेक बाबी कर्मचारीनिहाय विचारत कारकून ते उपजिल्हाधिकार्यांपर्यंत त्यांनी अनेकांची परीक्षा घेतली आणि खडेबोल सुनावले. सहा वाजता सुरू झालेली ’फायरिंग’ रात्री आठ वाजता संपली.
विविध कार्यालयात सुधारणा निश्चित झाल्या आहेत; मात्र माझ्या अपेक्षेप्रमाणे झाल्या नाहीत. कर्मचार्यांनी बेसिक गोष्टीची माहिती करून घ्यावी, वेळेत कामे करावीत. कामात सुधारणा झाली पाहिजे. - तुकाराम मुंढे (जिल्हाधिकारी )



.jpg)

0 Comments