१४ मार्चला पुण्यात पारपत्र (Passport) मेळा

पंढरपूर लाईव्ह

पुण्याच्या क्षेत्रीय पारपत्र कार्यालयाने शनिवार, १४ मार्च २०१५ रोजी एका विशेष पारपत्र मेळ्याचे आयोजन केले आहे. मुंढवा येथील पारपत्र कार्यालयात हा मेळा होईल. पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच सोलापूर या जिल्ह्यातील नागरिक या मेळ्याचा लाभ घेऊ शकतात, अशी माहिती पुणे क्षेत्रीय पारपत्र कार्यालयाने आपल्या पत्रकाद्वारे कळवली आहे.   

हा मेळा साधारण गटातील अर्जदारांसाठी असून १४०० व्यक्तींची नावनोंदणी यासाठी करून घेतली जाईल. तत्काळ, रोखून ठेवलेले, 'Walk In' तसेच 'PCC' गटातील अर्जदारांसाठी हा मेळा नाही. 

या मेळ्यामध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आहे. www.passportindia.gov.in या संकेतस्थळावर नागरिकांनी नावनोंदणी करावी. ११ मार्च २०१५ रोजी बरोबर दुपारी १२ वाजता ही प्रक्रिया सुरु होईल. १४ मार्च २०१५ रोजी नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेल्या अर्जदारांनीच अर्ज क्रमांक पत्र (Application Reference Number- ARN) व स्वसाक्षांकित छायाचित्राच्या प्रती घेऊन पारपत्र सेवा केंद्राला भेट द्यावी.

या मेळ्याचा लाभ पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच सोलापूर या जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पारपत्र कार्यालयाने केले आहे.
 

******************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 10 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   72 हजार 958 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 418 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.


 

Post a Comment

0 Comments