पंढरपूर : (प्रतिनिधी) - महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र ऑलिम्पियाड अभियान 2014-15 अंतर्गत सब ज्युनिअर ऑलिम्पियाड (इ. 5 वी ते 7 वी) आणि ज्युनिअर ऑलिम्पियाड (इ. 8 वी ते 10 वी) स्पर्धा परीक्षेत पंढरपुरातील व्यंकटेश कॉम्पुटर्सच्या इ. 7 वीच्या ऋजुल अभिजित खुपसंगीकर याने जिल्ह्यात प्रथम तर अभिजित मंदार कुलकर्णी याने दुसरा तसेच इयत्ता आठवीच्या स्वराली निलेश सावळे हिने तिसरा तर सिद्धी मंदार केसकर हिने चौथा तर इयत्ता 6 वीच्या भगवती गुरुनाथ बहिरट याने चौथा क्रमांक प्राप्त करुन सोलापूर जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत घवघवीत यश मिळविले आहे.
दर वर्षी महाराष्ट्र ऑलिम्पियाड अभियान अंतर्गत सब ज्युनिअर ऑलिम्पियाड (इ. 5 वी ते 7 वी) आणि ज्युनिअर ऑलिम्पियाड (इ. 8 वी ते 10 वी) गणित, विज्ञान आणि बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या अधिकृत केंद्रामार्फत तीन टप्प्यात (तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तर) घेण्यात येतात. या मध्ये चालू वर्षी व्यंकटेश कॉम्पुटर्स च्या माध्यमातून 21 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती.
नुकत्याच घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय परीक्षेत त्यापैकी 12 विद्यार्थी पात्र ठरले. त्या व्यंकटेश कॉम्पुटर्स मधील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची यादी पुढीलप्रमाणे महाराष्ट्र सबज्युनिअर ऑलिम्पियाड इ. 5 वी - दीपराज रामचंद्र भोसले द. ह. कवठेकर प्रशाला (जिल्ह्यात 6 वा), प्रध्युम्न गणेश भोसले द. ह. कवठेकर प्रशाला (जिल्ह्यात 10 वा), इ. 6 वी - भगवती गुरुनाथ बहिरट द. ह. कवठेकर प्रशाला (जिल्ह्यात 4 था), समिता सुनील क्षीरसागर द. ह. कवठेकर प्रशाला (जिल्ह्यात 5 वी), इ. 7 वी - ऋजुल अभिजित खुपसंगीकर कवठेकर प्रशाला (जिल्ह्यात 1 ला), अभिजित मंदार कुलकर्णी कवठेकर प्रशाला (जिल्ह्यात 2 रा), अपूर्वा नितीन देशपांडे कवठेकर प्रशाला (जिल्ह्यात 6 वी), तसेच महाराष्ट्र ज्युनिअर ऑलिम्पियाड इ. 8 वी - स्वराली निलेश सावळे द. ह. कवठेकर प्रशाला (जिल्ह्यात 3 री), सिद्धी मंदार केसकर कवठेकर प्रशाला (जिल्ह्यात 4 थी), सत्यम सुनील क्षीरसागर द. ह. कवठेकर प्रशाला (जिल्ह्यात 5 वा), अनुष्का गोविंद पाटील द. ह. कवठेकर, प्रशाला (जिल्ह्यात 7 वी), श्रेया माधव कुलकर्णी द. ह. कवठेकर, प्रशाला (जिल्ह्यात 8 वी). या सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची उन्हाळ्याच्या सुट्टीत महाराष्ट्र ज्ञान महामंडळातर्फे घेण्यात येणार्या जिल्हास्तरीय गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रा. गुरुनाथ बहिरट आणि अॅड. सौ. श्रद्धा बहिरट यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे एमकेसीएलचे सोलापूर रिजनचे मॅनेजर समीर पांडे, एलएलसीचे प्रमुख रोहित जेऊरकर, हारून शेख, शिवानंद पाटील, मलिक शेख, पं. ए. सोसायटीचे अध्यक्ष भागवताचार्य वा. ना. उत्पात, मानद सचिव ना. बा. रत्नपारखी, संचालक संजय कुलकर्णी, अॅड. भारत बहिरट, द. ह. कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश डबीर, उपमुख्याध्यापक दत्तात्रय तरळगट्टी, पर्यवेक्षक धट, कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील यारगट्टीकर, उपमुख्याध्यापक शांताराम कुलकर्णी, पर्यवेक्षक विठ्ठल पाटील यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच भगवंत बहिरट, पत्रकार डॉ. राजेश फडे, प्रा. शाम गोगाव, प्रा. राजेश विभूते, प्रा. राजेंद्र भोसले, प्रा. अमित घाडगे यांनी अभिनंदन केले.
********************
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि.9 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 71 हजार 568 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 244 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...



.jpg)














0 Comments