ज्येष्ठ पत्रकार ज्येष्ठ पत्रकार विनोद मेहता यांचे निधन

08 मार्च :  ज्येष्ठ पत्रकार आणि आउटलूक मासिकाचे संपादक विनोद मेहता यांचे आज निधन झाले. मेहता 73 वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. अनेक अवयव निकामी झाले होते. अखेर आज सकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

‘इंडिया टुडे’तून पत्रकारीतेची सुरूवात करणार्‍या मेहता यांनी ‘द पायोनियर’, ‘संडे ऑब्जर्बर’, ‘द इंडिपेंडेन्ट’ आणि ‘आऊटलूक’ या वृत्तपत्रे आणि मासिकांच्या संपादकपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली होती. 60 ते 90 या कालावधीत त्यांची कारकीर्द बहरली. मेहता हे त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक मतांसाठी ओळखले जात होते. भारतीय पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये विनोद मेहता यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी अनेक पुस्तक लिहिली. `लखनौ बॉय` हे त्यांचं आत्मचरित्र खूप गाजलं होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेहतांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच पत्रकारितेचे मोठे नुकसान झाले आहे, अशी भावना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अनुपम खेर, सोनिया गांधी यांनी ट्विटरवरुन मेहतांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

******

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.7 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   70 हजार 788 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 121 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









Post a Comment

0 Comments