पंढरीत बारावीच्या परीक्षेस जात असताना विद्यार्थिनीचा विनयभंग करुन मारहाण

पंढरपूर लाईव्ह

बुधवार दि.2 मार्च 2015

पंढरपूर शहरात आज दुपारी दोन वाजणेच्या सुमारास बारावीच्या परीक्षेस जात असणार्‍या एका विद्यार्थिनीचा विनयभंग करुन तिला एका तरुणाने मारहाण केल्याची घटना घडली आहे.


याबाबत पंढरपूर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पंढरपूर शहरातील विवेक वर्धिणी शाळेसमोर आज दुपारी  2:15 वाजणेच्या सुमारास एक विद्यार्थिनी बारावीची परीक्षा देण्याकरीता आली होती. ती परीक्षा केंद्रात जात असताना तिस एका तरुणाने जाणीवपुर्वक विनयभंग करण्याच्या उद्देशाने धक्का दिला. त्याबाबत सदर विद्यार्थिनीने त्यास जाब विचारला असता त्याने तिच्या केसास धरुन तिस मारहाण केली. दरम्यान तेथे गोंधळ झाल्याने सदर पीडीत विद्यार्थिनीचे वडील तेथे आले त्यांनी त्या तरुणास त्याबाबत जाब विचारला असता सदर तरुणासोबत असलेल्या दुसर्‍या तरुणाने त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. दरम्यान विहीत विद्यार्थिनीची परिक्षा असल्याने ती परीक्षा देण्याकरीता निघुन गेली. परिक्षा संपल्यानंतर तिच्या वडिलांनी त्या तरुणाच्या नावाबाबत चौकशी केली असता त्या तरुणाचे नाव ओंकार प्रदिप व्यवहारे (रा. संतपेठ, पंढरपूर व त्याचे सोबत असलेल्या दुसर्‍या इसमाचे नाव प्रविण व्यवहारे असे असून तो त्या तरुणाचा चुलता असल्याचे समजले.  घडलेल्या प्रकाराबाबत पिडीत  मुलीने शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दिली असून त्याप्रमाणे  भाग 1 ते 5 गु..र.नं. 38/2015 भा.द.वि. कलम 354, 323, 504, 34  प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री. किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोसई श्री. अनिल कदम हे करीत आहेत.

सदर घटना समजताच  मुलीचे नातेवाईक व कांही सामाजिक संघटना संतप्त झाल्या. विवेक वर्धिणी शाळेसमोर गर्दी वाढु लागलेली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा वाढवून परिस्थिती नियंत्रणात आणली. मुलीची परीक्षा देवून झाल्यानंतर गुन्ह्याची नोंद रात्री उशीरा झाली.

***

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 4 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   68 हजार 610 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 826 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









 

 



Post a Comment

0 Comments