पंढरपूर लाईव्ह पंढरपूर शहर व वाहतुक व्यवस्था (विशेष लेख:- भगवान वानखेडे) दि.7 मार्च 2015:-
पंढरपूर शहरात सर्वत्रच वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. याला एकमेव कारण म्हणजे येथील वाहतुकीला शिस्त नाही... सुसाट वेगात धावणार्या बाईकर्सवर पोलिसांचा वचक नाही... अवजड वाहने बायपास रस्त्यांऐवजी बेकायदेशीर पध्दतीने भर शहरातून बिनबोभाट वावरत असतात... असाच एक रस्ता पंढरपूर शहराच्या उपनगरातील नागरिकांसाठी फार मोठी डोकेदुखी होऊन बसलाय... तो म्हणजे ‘लिंक रोड’, नविन कराड नाका ते क्रांतीसिंह नाना पाटील (के.बी.पी.) या दोन चौकांना जोडणारा हा रस्ता विश्रामधाम (डाक बंगला) कडे जाणारा असल्यामुळे याला व्ही.आय.पी. रस्ताही म्हटले जाते. या रस्त्यावर कुठेही गतीरोधक अथवा झेब्रा क्रॉसिंग नाही. यामुळे येथून होणारी अवजड वाहतुक बेशिस्तपणे भरधाव वेगाने अहोरात्र चालु असते. तसेच हल्ली जास्त सीसीच्या बाईक्स् तरुणाईच्या हातात पडलेल्या आढळतात. अशा बाईकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वेगाची नशा डोक्यात भिनलेले हे तरुण बाईकर्स या मार्गावरुन भरधाव वेगाने वावरताना नेहमीच आढळतात. कारण एकच ‘नो स्पीड ब्रेकर, नो झेब्रा क्राँसिंग अॅन्ड नो ट्रॅफिक हवालदार’ हा रस्ता ओलांडताना नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत धरुन वावरावे लागते.
अवजड वाहतुक लिंकरोडवरुन नकोच...!
सातारा, सांगोला, कोल्हापूर, मिरज, सांगली, इचलकरंजी या शहरांकडे जाणारी अवजड वाहने थेट के.बी.पी. चौकातून कराड नाक्याकडे याच मार्गावरुन भरधाव वेगात जातात. पुणे, टेंभुर्णी, सोलापूर, मराठवाडा या भागाकडे जाणारी अवजड वाहने नविन कराड नाका चौकातून याच रस्त्याने के.बी.पी. चौकाकडे जातात. वास्तवीक पहाता अवजड वाहनांसाठी इसबावी येथील विसावा मंदिरामागे एक मोठा बायपास रस्ता उपलब्ध आहे. मात्र ही अवजड वाहतुक त्या मार्गाकडे का वळवली जात नाही. हे अजुन गुलदस्त्यातच आहे. अवजड वाहतुक जर विसावा मंदिराच्या मागील बायपास मार्गावरुन झाली तर उपनगरातील नागरिकांना थोडा तरी दिलासा मिळेल.
लिंक रोडवर स्पीड ब्रेकर्स किंवा झेब्रा क्रॉसिंगची अत्यावश्यकता..!
प्रज्ञा प्राथमिक विद्यालय, इंग्लिश मिडीयम स्कुल, कवठेकर प्रशाला, राजाराम इंगिलश मिडीयम स्कुल, यशकिर्ती विद्यालय, मॉडर्न एज्यूकेशन स्कुल, रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय, उमा महाविद्यालय, के.बी.पी. महाविद्यालय, सिंहगड इनस्टिट्युट, न्युसातारा संकुल, कर्मयोगी अभियांत्रीकी महाविद्यालय शेळवे, आदी शैक्षणिक संस्थाकडे जाण्यासाठी लिंक रोडवरुन मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा राबता असतो. अनेक लहान मुलांना माता-भगिणी शाळेत सोडताना हा रस्ता जीव मुठीत धरुन क्रॉस करतात. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी सायकलवरुन जा-ये करत असतात, अनेक वृध्द मंडळी सुध्दा हा रस्ता ओलांडताना चाचरत असतात याला कारण एकच आहे ते म्हणजे ‘‘येथे स्पीड ब्रेकर्स नाही.’’
व्ही.आय.पी. मार्गाचे कारण सांगत येथे स्पीड ब्रेकरच केले जात नाहीत. मात्र विशेषत: हॉटेल नागालॅन्ड, देशमुख पेट्रोल पंप, डाक बंगला, हॉटेल अश्वमेघ आदी पॉईंट वरुन रोड क्रॉसींग डेंजरस् होऊन बसलेलं आहे. यामुळे किमान या कांही ठिकाणी तरी स्पीड ब्रेकर्स किंवा किमान झेब्रा क्रॉसिंग तरी असावेत ही गेल्या कित्येक वर्षापासूनची उपनगरवासीयांची मागणी दुर्लक्षीत आहे.
व्हीआयपी मार्ग छळतोय सामान्य पंढरपूरकरांना..!
व्हीआयपी मार्ग म्हणून स्पीड ब्रेकर्स नाहीत असे म्हटले जाते मात्र यामुळे पंढरपूरातील या मार्गावरुन दररोज प्रवास करणारे स्थानिक रहिवाशी त्रस्त आहेत. ‘‘हा रस्ता क्रॉस करुन ज्यांची मुले शाळेत किंवा ट्युशनसाठी जातात ती मुले घरी सुखरुप येईपर्यंत नागरिकंाच्या जीवात जीव नसतो.’’ कांही ठिकाणी स्पीड ब्रेकर्स किंवा किमान झेब्रा क्रॉसिंग तरी असावेत ही गेल्या कित्येक वर्षापासूनची उपनगरवासीयांची मागणी दुर्लक्षीत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक व जबाबदार अधिकार्यांनी याकडे लक्ष देवून वरील प्रश्न त्वरीत सोडवावा अशी मागणी उपनगरीय रहिवाशांकडून होत आहे.
के.बी.पी. चौक आणि नविन कराड नाक्यावर कायमस्वरुपी वाहतुक पोलिस असावेत..!
वारंवार मागणी करुन सुध्दा या एका गोष्टीकडे पंढरपूर वाहतुक पोलिस शाखेचे दुर्लक्ष होत आहे. ते म्हणजे के.बी.पी. चौक आणि नविन कराड नाका या दोन चौकात कायमस्वरुपी वाहतुकनियंत्रणासाठी पोलिस हवे आहेत. जेणेकरुन येथुन होणार्या अवजड वाहतुकीला आणि बेशिस्त बाईकर्सना शिस्त लागेल. पोलिसांचा वचक बसेल. या दोन्ही ठिकाणी पोलिस चौक्या बांधलेल्या असतात मात्र ठराविक कालावधी सोडला तर या चौक्या बंद असलेल्या आढळून येतात. किमान एक-एक वाहतुक पोलिस या दोन्ही चौकात कायमस्वरुपी असणे आवश्यक असल्याने याबाबतची नागरिकांची मागणी आहे.
उपनगरामधील लोकवस्ती अलिकडच्या काळात झपाट्याने वाढलेली आहे. याचा सारासार विचार करुन लिंक रोड व दोन प्रमुख चौकाबाबत वरील सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे.
*******
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि.7 मार्च 2015 रोजी‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 70 हजार 788च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 121 च्या
घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून
यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक
दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...
0 Comments