सचिनची मुलगी शाहरूखसोबत बॉलिवूडमध्ये?

पंढरपूर लाईव्ह

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी श्रिया बॉलिवूडमध्ये लवकरच एंट्री करणार असल्याची चर्चा आहे. श्रिया बॉलिवूडमध्ये शाहरूख खानचा चित्रपट 'फॅन'द्वारे एंट्री करेल. मनीष शर्मा यांच्या या फिल्म बाबत अद्याप जास्त काही माहिती मिळाली नाहीय. मात्र, श्रिया या चित्रपटाचा एक भाग असेल, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय. 

सूत्रांनुसार 'शाहरूख खान दिल्लीत या फिल्मचं शूटिंग करत आहे आणि श्रिया त्याच्या बरोबर आहे. श्रियाची भूमिका खूप छोटी आहे. पण महत्त्वाची असणार आहे. फिल्मशी निगडित सर्वच लोकांना चूप राहण्याचे आदेश देण्यात आलेत.'

श्रियानं ऑस्कर विजेता दिग्दर्शक क्लाउड लिलॉचची फिल्म 'अं प्लू यून'ला जानेवारीत शूट केलंय. श्रियानं २०१३मध्ये रिलीज झालेल्या 'एकुलती एक' चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटांमध्ये डेब्यू केला होता.
श्रियानं आपल्या करिअरची सुरूवात शॉर्ट फिल्म 'पँटेड सिग्नल' (२०१२) आणि ड्रेसवाला (२०१३) पासून केलीय. अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये श्रियाच्या या चित्रपटांचं कौतुक झालं. गेल्यावर्षी इंग्रजी प्ले 'इंटरनल अफेअर्स'मध्येही तिनं काम केलं होतं.

********

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.6 मार्च  2015 रोजी पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   70 हजार 076 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 026 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









Post a Comment

0 Comments