पंढरपूर लाईव्ह 8 march 2015
जळगाव : परिस्थिती माणसाला काय करायला लावेल हे सांगता येत नाही, पण चोराने नैतिकतेला साक्ष ठेवून गरजेपुरता पैसे वापरले आणि बाकीचे पैसे परत केले. केळी आणि कापूस विकून शेतकरी भारत शिंदे यांना एक लाख रूपये हाती आले. पैसे घरात ठेऊन संपूर्ण शिंदे कुटुंबिय लग्नाला गेलं, या दरम्यान शिंदे यांच्या घरातून एक लाखांची चोरी झाली.
मात्र शेतकऱ्याच्या कष्टाच्या पैशांची जाण चोरालाही असावी, म्हणून चोराने भारत शिंदे यांच्या मागच्या दारात ८२ हजारांची रोकड ठेवून एक चिठ्ठीही सोबत टाकली. यात महिलेने आपले नाव उमा देवी लिहिले आहे. या महिलेला दवाखान्यासाठी १८ हजार रूपये खर्च आला असल्याचं सांगण्यात येतंय.पतीच्या उपचारासाठी आपल्याला पैशांची चोरी करावी लागली, मात्र पैसे हातात असूनही पतीचं निधन झालं, या पैशातून दवाखान्याचं बिल आणि पार्थिव घरी नेण्याचा खर्च झाला, मात्र उर्वरीत रक्कम चोराने परत केल्याचं, चिठ्ठीत लिहिलं आहे. या चिठ्ठीवरून महिलेवर परिस्थितीमुळे चोरी करण्याची वेळ आली असावी, असं समजून शिंदे यांनी पोलिसांत तक्रार केली नाही.
*****
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि.8 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 71 हजार 240 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 200 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...




.jpg)














0 Comments