पोहोरगाव येथील वाळु उपसा कामगार मारहाण प्रकरणाला वेगेळे वळण नदीपात्रात मिळाला वाळु उपसा कामगार विकीचा मृतदेह

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):- दि.9 मार्च 2015

पोहरगाव (ता. पंढरपूर) येथील कांही  गावकर्‍यांनी वाळूची वाहने मोफत द्यावीत, असे म्हणत अधिकृत ठेकेदारांच्या चार कामगारांना बेदम मारहाण करुन जखमी केले. या दरम्यान चार वाहनांची तोडफोड झाल्याने 47 हजारांचे नुकसान झाले आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. त्या ठिकाणी काम करत असलेल्या सोमनाथ तानाजी बनसोडे (रा. अनवली, ता. पंढरपूर), श्रीकांत विठ्ठल घोलप (रा. लक्ष्मी टाकळी, ता. पंढरपूर), विकास भारत वाघमारे (रा. पंढरपूर), किरण शिवाजी बनसोडे (रा. आंबे, ता. पंढरपूर) या चार जणांना वाहने भरून न दिल्याने पोहोरगांव मधील कांही ग्रामस्थांनी मारहाण केली. यावेळेपासून विकास उर्फ विकी भारत वाघमारे (21) रा. संतपेठ, पंढरपूर हा तरुण बेपत्ता होता. आज दि. 9 मार्च 2015 रोजी सकाळी 7:30 वाजता त्याची बॉडी पोहोरगाव येथील नदीपात्रात मिळाली. मयत विकी हा पंढरपूरातील संतपेठ परिसरात वास्तव्यास होता. अत्यंत गरीब कुटूंबातील या युवकाच्या अशा करुण अंतामुळे परिसरात सर्वत्र हळ-हळ व्यक्त होत आहे.


शनिवार दि. 7  मार्च ला घडलेल्या या घटनेत किरण बनसोडे यांच्या डोक्याला जबर मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यावेळी 1 टिपर, 1 जे.सी.बी., 1 मोटरसायकलची तोडफोड करण्यात आली.  आज या प्रकरणातील कामगार विकास उर्फ विकी  वाघमारे चा मृत्यु झाल्याने घटनेला गंभीर वळण लागलेले आहे. बाबा पाटील, शाहू गायकवाड, जयसिंग गायकवाड, समाधान गायकवाड, बंडू घुले, गणेश घुले, पुरुषोत्तम गायकवाड, भारत गायकवाड (सर्व रा. पोहरगाव, ता. पंढरपूर) यांच्यावर पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात विकी वाघमारे च्या हत्येसंदर्भात 302 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश जाधव हे करीत आहेत.

*****

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.9 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   71 हजार 538 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 240 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 








 

 


Post a Comment

0 Comments