पुरूषांच्या मानसिकतेत बदल झाल्यास स्त्रियांना सन्मांनाची वागणूक मिळेल -न्यायाधीष जी.एस.माने

श्री. विठ्ठल एज्युकेषन अ‍ॅण्ड रिसर्च इंन्स्टिटयुट मध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा

पंढरपूर लाईव्ह

- ‘जर पुरूषांनी आपल्या मानसिकतेत बदल करुन स्त्रियांना सन्मांनाची वागणूक दिली तर कोणत्याही कायदयाची गरज भासणार नाही. पण आजच्या स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार पाहून कायदयात सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे अधिकार सांगतो तर दुसरीकडे कर्तव्याची जाणिव करुन दिली जाते. याचा आधार घेऊन नेहमी अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करा. प्रयत्नांचा पराभव कधीच होत नाही, परंतु जेव्हा प्रयत्न करण्यास माघार घेतो तेव्हा त्याचा लढायच्या अगोदरच पराभव झालेला असतो. यासाठी विषेषता स्त्रियांनी कायदा जाणून घ्यावा व अन्यायाचा प्रतिकार करावा.’ असे प्रतिपादन पंढरपूर येथील दिवाणी न्यायाधीष जी.एस.माने यांनी केले.

     पंढरपूर बार असोषिएषन व श्री. विठ्ठल एज्युकेषन अ‍ॅण्ड रिसर्च इंन्स्टिटयुट यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यवर्ती अँम्पी थिएटरमध्ये ‘जागतिक महिला दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून न्यायमुर्ती माने उपस्थितांसमोर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधिष एन.एम. जमादार या होत्या. दिपप्रज्वलनानंतर न्यायाधीष माने यांनी ‘व्हेअर देअर इज विल, देअर इज वे, सो बी हॅव स्ट्रॉग विल पॉवर’ असा बहुमोल संदेष दिला. पाहूण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतची वाटचाल  सांगुन कमवा व शिका योजनेबरोबरच इतर सुविधांची सविस्तर माहिती दिली. अ‍ॅड.व्ही.आर. कोष्टी यांनी ‘जिथे स्त्रियांचा आदर केला जातो. तिथे देवता वास करत असते. यासाठी सर्वांनी स्त्रियांचा सन्मान करा. यासाठी प्रत्येक पुरुषांनी स्त्रियांना प्रेरणा, प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. नगरसेविका सौ.सविता मोहोळकर यांनी आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे सांगून मुलींना उच्च षिक्षण घेण्याचे आवाहन केले. द.ह. बडवे यांनी कै. पार्वतीबाई बडवे प्रतिष्ठानचे कार्य निस्पृहपणे चालू असल्याचे सांगून त्यांची स्मृती जपण्याकरता अविरत चालू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी विद्यापिठात प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थींनींचा कै. पार्वतीबाई प्रतिष्ठानच्या वतीने षाल, श्रीफळ व ज्ञानेष्वरांची प्रतिमा देवून गौरविण्यात आले. अ‍ॅड.घाडगे यांनी आपल्या महत्वपुर्व भाषणात महिला परिषदेची माहिती देवून कामाच्या ठिकाणी होणारे ‘लैंगिक छळ विरोधी कायदा’ याविषयी मत मांडले. 

 स्त्रियांनी नोकरी षेती आणि कामाच्या ठिकाणी होणारा छळ सहन न     करता कायदयाचा आधार घ्यावा.’ असे आवाहन केले. अ‍ॅड. एम.ए. थोरात यांनी ‘अन्याय पिडीतांसाठी अर्थसाहय व कायदयातील तरतुदी यांची सविस्तर माहिती देवून विविध कलमांसाठी असणारी तरतुद व गुन्हेगारांना षिक्षा याची सविस्तर माहिती दिली. अ‍ॅड. अमृता रायचुरकर यांनी ‘स्त्रियांचा छळ व त्याचे प्रकार, षाररिक व मानसिक छळ या विरोधी कायदा, षिक्षा व तरतुदी’ यांची माहिती करुन दिली. अ‍ॅड. गांधी यांनी देखील बी.सी.एन.टी. कायदयाची माहिती दिली. अध्यक्षस्थानावरुन बोलताना न्यायमुर्ती जमादार म्हणाल्या,‘ महिला सर्वक्षेत्रात प्रगती करत असताना पुरुषांच्या बरोबरीने स्वातंत्र दिले पाहिजे’ असे सांगून स्त्रिभ्रुण हत्या व त्यावर असलेला कायदा या विषयी मत मांडून कायदा तयार करताना मानवी हक्काचा देखील विचार करावा लागतो.’असे सांगितले. यावेळी बार असोषियनचे अध्यक्ष किरण घाडगे,संध्या बडवे, वासंती बडवे, एम.आय.टी.च्या के.आर. सुनिता, बार असोषियनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. रणनवरे, जेष्ठ पत्रकार सत्यविजय मोहोळकर, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, जेष्ठ विष्वस्त दादासाहेब रोंगे,संस्थेअतर्गंत असणार्‍या इतर तिनही महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग, सांस्कृतिक विभाग प्रमुख ए.जी.कोरके, विद्यापिठ प्रतिनिधी साहिल भगत, आनंद लवटे,यांच्यासह विद्यार्थी व विद्यार्थींनी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. यषपाल खेडकर यांनी तर आभार  अ‍ॅड. क्रांती कदम यांनी मानले.
छायाचित्र:-

2.विद्यापीठात प्रथम आलेल्या गुणवंताचा सत्कार करताना चौथे दिवाणी न्यायाधीष जी.एस.माने, न्यायाधीष एन.एम. जमादार संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, जेष्ठ विष्वस्त दादासाहेब रोंगे व आदी. 
2. दिपप्रज्वलन करताना न्यायाधीष एन.एम. जमादार सोबत डावीकडून संस्थेचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, न्यायाधीष जी.एस.माने यांच्यासह न्यायमुर्ती व विधिज्ञ,
3.‘जागतिक महिला दिन’ निमित्त श्री. विठ्ठल एज्युकेषन अ‍ॅण्ड रिसर्च इंन्सिटयुट मध्ये प्रमुख पाहूणे म्हणून दिवाणी न्यायाधीष जी.एस.माने मार्गदर्षन करत होते. सोबत डावीकडून जेष्ठ विष्वस्त दादासाहेब रोंगे, संस्थेचे सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्यासह न्यायमुर्ती व विधिज्ञ.

*****

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.9 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   71 हजार 538 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 240 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 








 

 


Post a Comment

0 Comments