पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर दि.09:- राज्यात निर्माण होणा-या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राज्य शासनाने सर्वांसाठी पाणी टंचाई मुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत "जलयुक्त शिवार अभियान" ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, या अभियानातंर्गत पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील अमोल शेळके यांच्या विहिरीचे लोकसहभागातून
पुनर्भरणाचे काम पुर्ण करण्यात आले असल्याची माहिती प्र.तालुका कृषी अधिकारी एम.यु.कौलगे यांनी दिली.

या अभियानातंर्गत विहिर पुनर्भरणाचे काम पुर्ण करण्यासाठी मंडळ कृषि अधिकारी एस.बी.आहेरकर, कृषि
*****
पर्यवेक्षक एन.टी. काटे, कृषि-सहाय्यक यु.एस.निकम, बी.के.चौगुले, एस.आर.पाटील, एन.डी.बनसोडे यांनी ग्रामस्थांना तांत्रीक मार्गदर्शन केले. या अभियानातंर्गत गावातील सुमारे 200 पेक्षा अधिक विहिरींचे पुनर्भरण करण्यात येणार असून, जास्तीत-जास्त शेतक-यांनी विहिरींचे पुनर्भरण करण्यासाठी कृषि सहाय्यक श्री.निकम यांच्या कडे संपर्क साधावा असे आवाहनही प्र.तालुका कृषि अधिकारी श्री.कौलगे यांनी केले आहे.

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि.9 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 71 हजार 568 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 244 च्या
घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून
यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक
दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...
0 Comments