विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, महाराष्ट ्र राज्य कुस्तीगीर परिेषद यांच्या संयुे राष्ट ्रधर्म पूजक - दादाराव कराड स्मृती ‘‘राज्यस्तरीय महाराष्ट ्र कुस्ती महा-वीर स्पर्धा- 2015

दिनांक : 9/3/2015

पुणे, दि. 9 : विश्‍व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट ्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या संयुे विद्यमाने रामेश्वर (रुई), ता. जि. लातूर येथे संतश्रेष्ठ  श्री एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून ‘राष्ट ्रधर्म पूजक - दादाराव कराड स्मृती - राज्यस्तरीय महाराष्ट ्र कुस्ती महा-वीर स्पर्धा-2015’ शुक्रवार, दि.13 मार्च 2015 व शनिवार, दि. 14 मार्च 2015 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.


महाराष्ट ्राच्या कुस्ती परंपरेला प्रोत्साहन देणार्‍या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या बलोपासनेच्या धोरणाला अनुसरुन या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे हे 9 वे वर्ष आहे.
शुक्रवार, दि. 13 मार्च 2015 रोजी दुपारी 3.00 वाजता होणार्‍या उद2घाटन समारंभासाठी 3 हिंद केसरी पै.मा.जगदीश कालीरमण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हिंद केसरी मा. श्री. श्रीपती खंचनाळे, हिंद केसरी मा. श्री. गणपतराव आंदळकर, महान भारत केसरी मा. श्री. दादू चौगुले, हिंद केसरी मा. श्री. दीनानाथ सिंग, व 3 महाराष्ट ्र केसरी व ऑलिंपियन,  आशियाई पदक विजेते पै.मा. नरसिंह यादव हे विशेष सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या स्पर्धेसाठी भारतातील व विशेषकरुन महाराष्ट ्रातील नामवंत मल्लांना निमंत्रित केले असून स्पर्धेेतील विजेत्या मल्लांना महावस्त्र, श्रीङ्गळ, ज्ञानेश्‍वर माऊलींची प्रतिमा, सुवर्ण/रौप्य/कांस्य पदक, रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. अखिल महाराष्ट ्रातील सर्वात श्रेष्ठ अशा कुस्तीगीराला ‘महाराष्ट ्र कुस्ती महा-वीर’हा अत्यंत बहुमानाचा किताब, सन्मानपत्र, चांदीची गदा व रोख रु. 51,000/- देण्यात येतील.

इतर विविध वजन गटातील विजेत्या मल्लांना गटनिहाय रु. 25,000/-, रु.20,000/- रु.15,000/-, रु.10,000, रु.8,000/-रु. 5,000/- अशा भरीव स्वरुपाची पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात येईल.

या स्पर्धेचे वजन गट व बक्षिसे पुढीलप्रमाणे -(प्रथम क्रमांक - सुवर्णपदक, द्वितीय क्रमांक - रौप्य पदक, तृतीय क्रमांक - कांस्यपदक व रोख र क्कम पुढे दिल्याप्रमाणे)

---------------------------------------------------

वजन गट प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक

तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक

---------------------------------------------------

86 ते 125 कि. रु. 51,000/- रु. 31,000/- रु. 21,000/-

(खुला गट)

86 किलो रु. 25,000/- रु. 20,000/- रु. 15,000/- रु. 8,000/-

74 किलो रु. 20,000/- रु. 15,000/- रु. 10,000/- रु. 5,000/-

रु. 11,000/-

70 किलो रु. 15,000/- रु. 10,000/- रु. 7,000/- रु. 4,000/-

65 किलो रु. 10,000/- रु. 8,000/- रु. 5,000/- रु. 3,000/-

61 किलो रु. 8,000/- रु. 5,000/- रु. 3,000/- रु. 2,000/-

57 किलो रु. 5,000/- रु. 3,000/- रु. 2,000/- रु. 1,500/-

---------------------------------------------------

1ार्टर ङ्गायनल (उपउपांत्य) ङ्गेरीमध्ये पराभूत होणार्‍या 57, 61 व 65 किलोवजन गटातील सर्व कुस्तीगीरांना प्रत्येकी रु. 1,000/- तसेच, 70, 74 व 86 किलो वजनगटातील सर्व कुस्तीगीरांना प्रत्येकी रु. 2,000/- व खुल्या गटातील सर्व कुस्तीगीरांना प्रत्येकी रु. 3,000/- मानधन देण्यात येईल.

राष्ट ्रधर्म-पूजक, प्रखर देशभे वै. दादाराव साधू कराड यांचा लातूर जिल्ह्यातील रामेश्वर (रुई) या खेडयातील एका वारकरी कुटुंबात जन्म झाला. तरुणपणापासून त्यांना जाज्वल्य देशाभिमानाने भारुन टाकले होते. कमावलेले शरीर, ईश्वर व देशनिष्ठा, अपार कष्ट करण्याची तयारी व प्रभावी व्यिेमत्व या जोरावर त्यांनी आपल्या खेडयातील जनतेला व विशेषत: तरुणांना परकीय सत्ते विरुद्ध लढा देण्यास प्रोत्साहित केले. केवळ एवढेच नव्हे, तर मजबूत समाज बांधणीसाठी, धर्माधर्मातील, जाती-जातीतील व विशेष करुन रझाकारांच्या काळात हिंदू-मुस्लिम समाजातील भेद दूर करुन एकोपा निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या पंचक्रोशीतील रयतेला जागृत केले. अशा या लोकविलक्षण विभूतीच्या स्मरणार्थ शरीरसौष्ठव व आरो1/2यासाठी प्रेरित करणारी राज्य पातळीवरील महाराष्ट ्र कुस्ती महावीर ही नाविन्यपूर्ण स्पर्धा भरविण्यात येत आहे.

त्याचबरोबर थोर स्वातंत्र्यसेनानी, राष्ट ्रीय कीर्तनकार, आरो1/2यशास्त्रातील एक महान चमत्कार, योगमहर्षि शतायुषी वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्ङ्ग शेलारमामा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तंदुरुस्त अशा पंच्चाहत्तर (75) वर्षे वयाच्यापुढील मल्लांसाठी याच दिवशी एक आगळी वेगळी कुस्तीस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विजेत्यांना योगमहर्षि वै. रामचंद्र गोपाळ शेलार उर्ङ्ग शेलारमामा स्मृती सुवर्ण /रौप्य/कांस्य गौरवपदक बहाल करण्यात येईल.

महाराष्ट ्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस श्री. बाळासाहेब लांडगे, विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स
एमआयटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, रामेश्‍वर (रुई) चे माजी सरपंच श्री. तुळशीराम दा. कराड,
प्रगतीशील शेतकरी व प्रेरणास्थान श्री. काशीराम दा. कराड व महाराष्ट ्र कुस्ती महावीर स्पर्धेच्या संयोजन
समितीचे सचिव श्री. विलास कथुरे, माईर्स एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा.डॉ.मंगेश तुळशीराम
कराड, माईर्स एमआयटीचे कार्यकारी संचालक प्रा. राहुल विश्वनाथ कराड व माईर्स एमआयएमएसआर
वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक श्री. रमेश काशीराम कराड यांच्या प्रमुख मार्गदर्शना खाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.सर्व आबालवृद्धांना सहभागी होता येण्यासाठी ही स्पर्धा खालील वजन गटात होईल.

वजन गट : 1) 57 किलो 2) 61 किलो 3) 65 किलो 4) 70 किलो 5) 74 किलो 6) 86 किलो 7) खुला गट 86 ते 125 किलो. सर्व मल्लांची वजने गुरूवार, दि. 12 मार्च 2015 रोजी सायं. 4 ते 8 व शुक्रवार, दि. 13 मार्च 2015 रोजी सकाळी 7 ते 10 पयरत घेतली जातील. त्यानंतर या कुस्ती स्पर्धेला सुरुवात होईल.

- पारितोषिक वितरण समारंभ -
शनिवार, दि. 14 मार्च 2015 रोजी सायंकाळी 5.30 वाजता पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. स्पर्धेसाठी येणार्‍या जिल्हा कुस्तीगीर संघातील मान्य निवडक कुस्तीगीरांच्या जाण्या-येण्याचे एस. टी. भाडे संयोजकांतर्ङ्गे देण्यात येईल. तसेच, निवासाची व भोजनाची व्यवस्था संयोजकांतर्ङ्गे करण्यात येईल. वरील स्पर्धा महाराष्ट ्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमानुसार घेण्यात येतील. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतीही प्रवेश ङ्गी नाही. यामध्ये जास्तीत जास्त मल्लांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकातर्ङ्गे करण्यात आले आहे.

 या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्री. विलास कथुरे (मो.नं.9850211404) व प्रा. पी. जी. धनवे (मो.नं.9822626006) यांच्याशी संपर्क साधावा.अशी माहिती विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड व महाराष्ट ्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस श्री. बाळासाहेब लांडगेयांनी पत्रकार परिषदेत दिलीे.
.

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.9 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   71 हजार 568 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 6 हजार 244 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 











Post a Comment

0 Comments