पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर 28 :
पंढरपूर येथील लोकमान्य विद्यालयाचे माजी कलाशिक्षक श्री.श्री.शं.सावळे यांची सर्वाधिक लाईव्ह रेखाचित्र काढणारा चित्रकार म्हणून ङ्गलिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डफ मध्ये नोंद झाली असून त्या प्रित्यर्थ श्री.सावळेसरांचा पंढरपूर बँकेच्या वतीने बँकेचे चेअरमन श्री.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देवून यथोचित सत्कार करणेत आला.
श्री.सावळे यांचे कॉन्टिनेन्टल प्रकाशन यांचे तर्फे रेखाचित्रांचे सुरेख पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले असून त्यात त्यांनी दिग्गज हिंदूस्थानी शास्त्रीय गायक वादकांची चित्रे प्रत्यक्ष मैफल चालू असताना रेखाटली आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ग्यानी झैलसिंग यांचेही त्यांनी प्रत्यक्ष चित्र रेखाटले, तेंव्हा त्यावेळी मा.राष्ट्रपतींनी त्यांचा खास गौरवही झाला होता.
यावेळी बोलताना श्री.परिचारक यांनी सावळे सर, गदगे सर यांचे सारखे चित्रकार पंढरी नगरीत घडावेत यासाठी प्रतिवर्षी बँकेतर्फे चित्रप्रतिभा महोत्सवाचे आयोजन करणेत येत असल्याची माहिती देवून लवकरच नवोदीत चित्रकारांना प्रोत्साहन मिळणेसाठी श्री.सावळे सरांचे रेखाचित्राचे प्रदर्शन भरविण्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी बँकेचे व्हाईस चेअरमन उदय उत्पात, नंदकुमार कुलकर्णीसर, एस.पी.कुलकर्णीसर, नारायण शिंगण, सिध्देश्वर शिंगण आदी मान्यवर उपस्थित होते.
*****
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 1 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 67 हजार 124 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 638
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 1 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 67 हजार 124 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 638 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments