पंढरपूर लाईव्ह
बुधवार दि.4 मार्च 2015होळी व रंगपंचमी या दोन्ही सणाला भारतीय आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीत अत्यंत अनन्यसाधारण महत्व आहे. या दिवशी प्रत्येक जण आपल्या जीवनातील सुख-दु:खं आणि ताण-तणाव विसरुन मुक्त हस्ताने एकमेकांवर मुक्त हस्ताने वेगवेगळ्या सप्तरंगांची उधळण करत असताना आढळतात. दंग होऊन जातात. मात्र समाजातील अपप्रवृत्तींच्या हालचालीवर लक्ष ठेवणे, घरातील आजारी व वयस्कांची काळजी घेणे, मुलांकडे लक्ष ठेवणे, वेगवेगळ्या प्ल्यूच्या साथीचे आजार हल्ली पसरत आहेत याबाबत स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आदी गोष्टींकडे कानाडोळा करुन चालणार नाही.
समाजातील कांही अपप्रवृत्तींकडून अशा सणासुदीच्या काळात आपल्या बेसावधपणाचा गैरफायदा घेऊन कांही अपप्रकार करण्याचा प्रयत्नही होऊ शकतो. त्यामुळे आनंद साजरा करताना गाफील राहु नका. तसेच बाजारात हल्ली अनेक अपायाकारक रंग विक्रीला येत असतात. अशा शरिराला घातक असणार्या रंगांपासून दुर रहावे. लहान मुलांना एकाकी सोडू नये. तसेच घरातील वृध्द व आजारी व्यक्तींची काळजी घेणेही तेवढेवच आवश्यक आहे.होळीत इमारतीच्या गच्चीवरून पाण्याचे फुगे आणि पिशव्या मारल्या जातात असे करु नये. यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकतात. होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी गच्चीला कुलुप ठोका किंवा तिथून फुग्यांचा मारा होणार नाही, याची काळजी घ्या, पोलिसांनी ही याबाबत योग्य त्या उपाययोजना केलेल्या आहेत. तसंच रंग विक्रेत्यांनाही नोटीसा बजावण्यात आल्या असून आरोग्यास हानिकारक रसायनयुक्त रंग आणि फुगे तसंच प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री थांबवण्याचे आदेश पोलिसांनी दिलेच असतील. मात्र आपणही सजग रहाणं महत्वाचं आहे. कुठे कांही अपप्रकार आढळून आल्यास त्वरीत पोलिसांशी संपर्क साधावा.
पंढरपूर लाईव्ह कडून सर्वांना होळीच्या व रंगपंचमीच्या सप्तरंगी शुभेच्छा...!
***
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 4 मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 68 हजार 504 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 818
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

0 Comments