पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव मुलांचे ग्रंथ संग्रहालय

Come and Discover the Joy of Learning, Creativity & Innovation @



 





पुस्तक परिचय स्पर्धा 2015 - माहिती व नियमावली

मुलांचे ग्रंथ संग्रहालय आणि कवितासागर प्रकाशन यांच्या वतीने हौशी लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी नवनवीन योजना राबवल्या जातात. यापूर्वी ललित लेखन स्पर्धा, लघुकथा स्पर्धा तसेच कविता स्पर्धा यांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना हौशी लेखकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता त्याबद्दल मुलांचे ग्रंथ संग्रहालय सर्वांचे ऋणी आहे. या वर्षी महाराष्ट्रातील अग्रगण्य पुस्तकांचे वितरक / प्रकाशक असलेल्या कवितासागर प्रकाशन यांच्या विशेष सहयोगाने "पुस्तक परिचय स्पर्धा 2015" आयोजित करण्यात येत आहे. वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, नवनवीन साहित्याचा परिचय व्हावा हा उद्देश प्रामुख्याने समोर ठेवून पुस्तक परिचय स्पर्धेचे आयोजन करीत आहोत. विशेषतः विद्यार्थ्यांच्या वाङ्‌मयीन कलागुणांना वाव मिळावा यासाठी संस्था प्रयत्न करत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगल्या पुस्तकांचा वाचकांना परिचय व्हावा; वाचकांच्या मनात संबंधित पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण व्हावी असे अभिप्रेत आहे. 

सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लेखकांना वयाची अट नाही. स्पर्धेसाठी ललित लेख, कवितासंग्रह, कथासंग्रह, कादंबरी इत्यादी पैकी किंवा अन्य कोणत्याही साहित्य प्रकारातील 01 जानेवारी 1989 ते 31 मार्च 2015 या दरम्यान प्रकाशित झालेल्या मराठी पुस्तकांचा परिचय सादर करावयाचा आहे. प्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (2000) शब्दांचा असावा. स्पर्धा 31 मार्च 2015 रोजी सकाळी 9 वाजता खुली होईल व प्रवेशिका घेण्या सुरवात होईल. सर्व प्रवेशिका ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने (ई-मेल / पोस्टाने / कुरिअरने) पाठविता येतील. आपली प्रवेशिका 15 मे 2015, रात्री 12 वाजेपर्यंत सादर करता येतील; शक्य झाल्यास आपण परिचय लिहिलेल्या पुस्तकाची प्रत सोबत पाठवावी.

1.       स्पर्धेसाठी रुपये 300/- प्रवेश मूल्य असून ते मनीऑर्डर / पार चेक / डिमांड ड्राफ्ट द्वारा कवितासागर प्रकाशन या नावाने पाठवावे. सदर स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले स्वत:चे लेखन प्रवेशिका म्हणून देणे आवश्यक आहे. एका पेक्षा अधिक साहित्य प्रकारात सहभाग घेता येईल किंवा एका पेक्षा अधिक पुस्तकांचे परिचय सुद्धा पाठविता येतील. (प्रत्येकी प्रवेश मूल्य 300)
2.       लेखनाचा प्रकार हा 'पुस्तक परिचय' असा ठेवण्यात आला आहे. पुस्तक परिचय लेखनासाठी मराठी भाषेतील 01 जानेवारी 1989 ते 31 मार्च 2015 कालखंडामध्ये प्रकाशित झालेले कोणतेही पुस्तक निवडता येईल. परिचयासाठी निवडलेले पुस्तक ललित लेख, कथासंग्रह (लघुकथा / दीर्घकथा), कादंबरी, काव्यसंग्रह, नाटिका, चरित्र, आत्मचरित्र, संशोधन, निबंधसंग्रह, प्रबोधनपर, धार्मिक, बालसाहित्य,  इत्यादी किंवा अन्य कोणताही साहित्यप्रकार चालेल. प्रवेशिका म्हणून सादर केला जाणारा लेख कमाल दोन हजार (2000)शब्दांचा असावा.
3.       या स्पर्धेसाठी प्रवेशिका दोन प्रकारे सादर करता येतील. () पहिल्या प्रकारात प्रवेशिका ऑनलाईन पद्धतीने, कोणत्याही युनिकोड देवनागरी फॉन्ट्सच्या सहाय्याने टंकलिखित करून sunildadapatil@gmail.com येथे थेट ई - मेल द्वारे सादर करता येतील.               () ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी टंकलिखित (हस्तलिखित प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही) प्रवेशिका खालील पत्त्यावर पोस्टाने / कुरिअरने स्पर्धेच्या अंतिम तारखेपूर्वी पोचतील अशा बेताने पाठवण्यात याव्यात. पोस्ट अथवा कुरियर सेवेतील दिरंगाईमुळे प्रवेशिका उशीरा पोहोचल्यास सदर प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही. तसेच त्याबाबात कोणताही पत्रव्यवहार अथवा खुलासे देण्यास स्पर्धा आयोजक बांधील असणार नाहीत. तसेच सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही. सबब सर्व स्पर्धकांना विनंती की त्यांनी प्रवेशिकेची एक प्रत आपल्यापाशी ठेवावी.
4.      एखादी प्रवेशिका स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा संपूर्ण हक्क स्पर्धेचे आयोजक राखून ठेवत आहेत. तसेच स्पर्धेसाठी सादर केलेली प्रवेशिका कोणत्याही कारणास्तव मागे घेता येणार नाही.
5.      अपेक्षेहून अधिक प्रवेशिका आल्यास अंतिम तारखे आधीच प्रवेशिका घेणे थांबवण्याचा हक्क स्पर्धा आयोजक राखून ठेवत आहे.
6.      प्रवेशिका म्हणून सादर केलेल्या लेखनामध्ये शुद्धलेखनाचा किमान दर्जा राखणे ही स्पर्धकाची जबाबदारी आहे याची कृपया नोंद घ्यावी.
7.      सर्व प्रवेशिकांचे परिक्षण साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती करतील. परिक्षकांची नावे यथावकाश जाहीर केली जातील.
8.      स्पर्धेचा निकाल स्पर्धा संपल्यानंतर सुमारे तीन - चार आठवड्यानंतर जाहीर केला जाईल, तो ई-मेल द्वारे सर्व स्पर्धकांना कळविण्यात येईल तसेच निवडक मुद्रित माध्यमातून जाहीर केला जाईल. (शाहू जन्म दिन 26 जून 2015 रोजी पारितोषिक वितरण ठेवण्याचा प्रयत्न असेल)
9.      निकालाबाबत स्पर्धा आयोजकांनी नियुक्त केलेल्या परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. यासंबंधी कोणतेही खुलासे देण्यास वा पत्रव्यवहार करण्यास स्पर्धा आयोजक किंवा कवितासागर प्रकाशन बांधील नाही याची कृपया नोंद घ्यावी.
10. स्पर्धेतील प्रत्येक साहित्य प्रकारामधील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय स्पर्धेला मिळणार्‍या प्रतिसादावरून व अन्य लेखनाच्या दर्जानुसार स्पर्धेतील सर्व साहित्य प्रकार मिळून पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम 26 जून 2015 रोजी आयोजित केला जाईल. कार्यक्रमाचा तपशील यथावकाश जाहीर केला जाईल.
11.   आंतरजालावर अन्यत्र पूर्वप्रकाशित लेखन स्पर्धेसाठी सादर करता येईल मात्र मुद्रित माध्यमात आधीच प्रसिद्ध झालेले लिखाण प्रवेशिका म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही. स्पर्धेत सहभागी होणार्‍या प्रत्येक व्यक्तीने खालील तपशील sunildadapatil@gmail.com या ई-मेलवर ताबडतोब कळवणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होणा-या प्रत्येकाला बहुरंगी सहभाग प्रमाणपत्र बहाल करण्यात येईल.

लेखकाचे पूर्ण नाव
                                                                     जन्म तारीख
दूरध्वनी क्रमांक
                                                                     शिक्षण
ई-मेल
                                                                     व्यवसा
वैयक्तिक ब्लॉग
                                                                     छंद
वैयक्तिक वेबसाईट
                                                                     प्रकाशित साहित्य
पत्रव्यवहाराचा पत्ता
(अनिवासी भारतीयांनी भारतातील पर्यायी पत्त्ता देणे आवश्यक)
                                                                     अप्रकाशित साहित्य

12. स्पर्धेच्या लेखनाचे संकलन प्रकाशित करण्याचा अधिकार आयोजक राखून ठेवत आहेत. स्पर्धेसाठी प्रवेशिका सादर करण्याचा निर्णय घेतानाच स्पर्धकाने आपली प्रवेशिका कवितासागर  प्रकाशन, जयसिंगपूर  द्वारा प्रकाशित विविध नियतकालिकात / विविध विषयावरील संकलनाच्या पुस्तकात समाविष्ट करण्याचा अधिकार सदर स्पर्धा आयोजकांना दिल्याचे मान्य केले आहे असे समजण्यात येईल. सदर प्रवेशिकेबाबत याशिवाय कोणताही अधिकार अथवा जबाबदारी पूर्णपणे स्पर्धकाची राहील याची कृपया नोंद घ्यावी.
13. सदर स्पर्धेची जाहिरात विविध माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. अनेक हितचिंतकांना सदर माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याची विनंती करण्यात येते. विविध माध्यमातून प्रसिद्धीदरम्यान सदर माहितीमध्ये होणार्‍या सहेतुक / निर्हेतुक बदलांशी आयोजक सहमत असतीलच असे नाही.  प्रत्येक साहित्य प्रकारातील स्पर्धकांची कमाल/किमान प्रवेश मर्यादा ठरविण्याचा अधिकार संयोजकांना आहे
14. कवी / लेखक / संपादक / संकलक / संशोधक / ग्रंथ वितरक किंवा प्रकाशक यांना सुद्धा आपल्या पुस्तकावर परिचय लिहून पाठविता येईल.
      प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा पत्ता: पुस्तक परिचय स्पर्धा 2015 द्वारा, डॉ. सुनील पाटील - संचालक, मुलांचे ग्रंथ संग्रहालय


पुस्तक परिचय म्हणजे संबंधित पुस्तकाची एक तोंडओळख. पुस्तक परिचय हे पुस्तकाबद्दल माहिती सांगू शकेल पण पुस्तक परीक्षण किंवा समिक्षा / साहित्यिक समिक्षा हे त्यापलिकडे जाऊन पुस्तकाचा तत्कालीन समाज जीवनाशी असलेला आंतरसंबंध उलगडून दाखवण्याचा प्रयत्न असू शकेल, त्यातून लेखकाच्या भुमिकेच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो व तोच उद्देश योग्य वाटतो.पुस्तक परिचय म्हणजे ज्या व्यक्तीने त्या कलाकृतीचा अस्वाद घेतलेला नाही त्या व्यक्तीला त्या कलाकृतीची करून देण्यात आलेली ओळख असते. पुस्तक परिचय नव्या आस्वादकांना आवाहन करणारे असते. पुस्तक परिचय हे संबंधित पुस्तका विषयी माहिती देते, पण पुस्तक परीक्षण मात्र केवळ त्याविशिष्ट पुस्तकाविषयीच नव्हे, तर पुस्तकाच्या विषयाबद्दलही भाष्य करत असते. पुस्तक परिचय कुणीही लिहू शकते, वाचक हे एकमेव बिरुद त्यासाठी पुरेस असते, मात्र एखाद्या पुस्तकाचे पुस्तक परीक्षण लिहिणारा हा त्या पुस्तकाच्या विषयाबद्दल विशेष आस्था बाळगणारा आणि त्या विषयातला ज्ञानी व्यक्ती असावा अशी माफक अपेक्षा असते. पुस्तकातील मर्यादा व बलस्थाने याचे तुलनात्मक व साक्षेपी विवेचन केले की ते परिक्षण होते आणि ते कार्य परीक्षक करत असतात. पुस्तक परिचयात पुस्तकाच्या अंतरंगाची तोंडओळख एवढाच भाग येतो.

...जी पुस्तके वर्तमानपत्रे, मासिके ह्यातून नावाजली जातात, लोकांच्यात ज्या पुस्तकांविषयी चर्चा होते अशा पुस्तकांच्या शेकडो किंबहुना हजारो प्रती हातोहात विकल्या जातात... खेडेगावातील माणसालासुद्धा पुस्तक घ्यावेसे वाटते, पण त्याला संधी मिळत नाही; कारण खेडयागांवात पुस्तकांची दुकाने नसतात त्याच प्रमाणे तेथें पुस्तक प्रदर्शने भरत नाहीत. घेतलेले पुस्तक आपल्याला आवडेल का? अशी भीती प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे माणूस पुस्तकात नक्की काय आहे? हे कळल्याशिवाय किंवा कोणी शिफारस केल्याशिवाय पुस्तक विकत घेत नाहीत, म्हणून पुस्तक परिचय स्पर्धेच्या निमित्ताने चांगल्या पुस्तकांची वाचकांना शिफारस केली जाणार आहे. पुस्तक विकत घेण्याची क्रिया ही सहजसुलभ असेल तर पुस्तक विकत घेतले जाते. या पुस्तक परिचय स्पर्धेच्या निमित्ताने संबंधित पुस्तकांचा परिचय जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे... जेणेकरून संबंधित पुस्तके लेखक / प्रकाशक यांचेकडून विकत घेण्याची वाचकांना निश्चितच प्रेरणा मिळेल असा आम्हांला दृढविश्वास वाटतो...

डॉ. सुनील पाटील - संचालक, मुलांचे ग्रंथ संग्रहालय,  
सुदर्शन इमारत, प्लॉट # १६, पद्मावती हौसिंग सोसायटी, बायपास रोड,  नांदणी नाक्याजवळ, जयसिंगपूर - ४१६१०१,
तालुका - शिरोळ, जिल्हा - कोल्हापूर, महाराष्ट्र, दूरध्वनी क्रमांक - 02322 225500, 9975873569  
sunildadapatil@gmail.com, kavitasagarpublication@gmail.com, sunil77p@rediffmail.com www.KavitaSagar.com

*******

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 24 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 86 हजार 139 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 260 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399


Post a Comment

0 Comments