पंढरपूर लाईव्ह- सोलापूर दि.21 -खा.शरद बनसोडे यांचे जनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे मुख्य केंद्र व्हावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
खा. बनसोडे यांचे गोल्डफिंच पेठ ( शिवस्मारक) येथे जनसंपर्क कार्यालयउभारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन ना. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनानंतर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना.विजय देशमुख हे होते.
लोकप्रतिनिधींनी लोकाभिमुख असावे तसेच जनतेशी सतत संपर्क ठेवावा. त्याचबरोबर हे जनसंपर्क कार्यालय सर्वसामान्यांसाठी 24 तास खुले रहावे असे
सांगून मुख्यमंत्री ना. फडणवीस पुढे म्हणाले की, सोलापूर शहर हे राज्यातील महत्वपुर्ण शहर असून या शहराचा अधिक गतीमान पध्दतीने विकास व्हावा. हा
विकास करण्याकरिता राज्य शासन सर्वोतोपरी सहाय्य करेल. त्याचबरोबर नगरविकास खात्याद्वारे जास्तीत जास्त आर्थिक पाठबळ या शहराला देऊ. विकसनशील शहरांना सध्या कच-याची समस्या भेडसावत आहे, याबाबत नागरिकांनी जागरुक राहून प्रशासनास योग्य ते सहकार्य करत आपली योग्य ती
जबाबदारी पार पाडावी असे आवाहनही मुख्यमंत्री महोदयांनी केले.
तत्पूर्वी हे संपर्क कार्यालय उभारण्या पाठीमागील भूमिका खा. शरद बनसोडे
यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितली. यावेळी पालकमंत्री विजय देशमुख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आ..सुभाष देशमुख, माजी आ. सिद्रामप्पा पाटील यांच्यासह हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000******

0 Comments