धुळे जिल्ह्याच्या चाळीसगावजवळ भीषण बस अपघातात 19 प्रवासी ठार; महाराष्ट्रावर शोककळा
धुळे, ता. 26: धुळे-चाळीसगाव रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ काल (गुरुवार) दुपारी भरधाव ट्रेलरने चाळीसगाव-सुरत एसटी बसला जोरदार धडक दिल्याने 19 जण मृत्युमुखी पडले आहेत.
यात 35 वर प्रवासी जखमी झाले असून त्यांना चाळीसगाव व धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही बस चाळीसगाववरून दुपारी एकला निघाली व चिंचगव्हाण फाट्यावर प्रवासी घेण्यासाठी थांबली होती. त्यावेळी धुळ्याहून चाळीसगावकडे येणाऱ्या भरणावर ट्रेलरने मोटारसायकलस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात या एसटीला चालकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. यात 19 जण जागीच मृत्यूमुखी पडले आहे. धडक इतकी जबरदस्त होती की, बसचा निम्मे भाग पूर्णपणे कापला गेला आहे.
या भीषण अपघाता मुळे संपुर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

0 Comments