जेवणाचे 400 रुपये न दिल्यामुळे हॉटेल मालकाने केली ग्राहकाची हत्या!

नाशिक : जेवणाचं बिल न दिल्यामुळे हॉटेलमालकाने ग्राहकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना येवला-वैजापूर महामार्गावरील खामगाव पाटी परिसरात घडली आहे. हत्येप्रकरणी हॉटेलमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये एका ग्राहकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोघं जण गंभीर जखमी आहेत. तिघेही जण औरंगाबादेतील वैजापूरचे रहिवासी आहेत.

वैजापूर येथे राहणारे राजू मणियार,अनिरुध्द विजय शिंदे आणि अनिल रामचंद्र खुडे हे तिघे जेवणासाठी अर्पिता ढाब्यावर गेले होते. जेवणाचे 400 रुपये बिल झाले. मात्र पैसे नसल्याने नंतर देतो असं सांगत तिघे जाऊ लागले. मात्र त्याच वेळी हॉटेल मालक गणेश ठेंगडे यांनी मागून जात त्यांच्या बाईकला धडक मारली.

धडक इतकी जबरदस्त होती की त्यात अनिरुध्द शिंदेचा मृत्यू झाला. अनिरुध्दच्या मृत्यूची माहिती त्याच्या नातेवाईकांना आणि मित्रांना समजताच त्यांनी अर्पिता ढाब्यावर जाऊन त्याची तोडफोड केली. अर्पिता ढाबा येवला तालुका पोलिस स्टेशन मध्ये हॉटेल मालक गणेश ठेंगडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गाडीसह त्याला ताब्यात घेतलं आहे.

********************

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com



Post a Comment

0 Comments