शेगाव दुमाला-अवैध वाळु वाहतुक पाईंटवरील तरुणाचे मृत्यु प्रकरण 5 जणांना अटक; न्यायालयाने सुनावली दिली 3 दिवसांची पोलिस कोठडी अटक झालेले सर्वजण पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथील

पंढरपूर लाईव्ह: काल दि. 22 जुन 2015 रोजी शेगाव (ता. पंढरपूर) येथील युवराज अभिमान दंदाडे (वय 25) या ट्रॅक्टर चालकाचा भीमा नदीच्या वाळवंटातील वाळू ट्रॅक्टर पुढे-मागे करताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे हूक तुटून त्याच्या अंगावर पडल्याने मृत्यू झाला. यामुळे दलित संघटनांनी त्याला बळजबरीने वाळू चोरी करण्यासाठी ट्रॅक्टर चालविण्यास प्रवृत्त करणार्‍यांना अटक करा, या मागणीसाठी मयत व्यक्तीचा मृतदेह तहसील कार्यालयासमोर ठेवून आंदोलन केले होते. यावेळी तहसीलदार गजानन गुरव व पोनि. दयानंद गावडे यांनी सर्व आरोपींना संध्याकाळपर्यंत अटक करणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. आज या प्रकरणी शेगाव दुमाला येथील मुन्ना उर्फ सचिन संभाजी अटकळे (32), विजय मोहन रणदिवे (32), गणेश संभाजी अटकळे (30), इंदर दगडु कांबळे (26), धनाजी शिवाजी पासले (22) या पाच  जणांना अटक करुन पंढरपूर येथील दिवाणी फौजदारी न्यायालयात हजर केले आले असताना न्यायमुर्ती श्री.माने यांनी सदर पाचही जणांना 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,  युवराज अभिमान दंदाडे हा रविवार दि. 22 जुन 2015 रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास भीमा नदीच्या वाळवंटातून वाळू चोरी करुन ट्रॅक्टर नदीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना ट्रॅक्टर (क्र. एम. एच. 13 /ऐ. 3886) च्या ट्रॉलीचे हूक निघाले. यामुळे ट्रॉली पलटी झाली. यावेळी युवराज दंदाडे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी संबंधित ट्रॅक्टर मालकाने युवराज दंदाडे याला उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. व नंतर त्याच्या नातेवाईकांना कळविले. युवराज दंदाडे याच्याकडे ट्रॅक्टर मालकाची 50 हजार रुपये उचल असल्याने तो त्याला इच्छा नसतानाही दमदाटी करुन वेळी-अवेळी वाळू चोरीसाठी घेऊन जात असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने मृतदेहासह आंदोलन केले होते. या आंदोलनात राहुल सर्वगोड, प्रकाश सर्वगोड, संतोष सर्वगोड, राजू सर्वगोड, बाळासाहेब कसबे, राहुल मोरे, अमित कसबे, शेगाव दुमाला गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. शेगाव (ता. पंढरपूर) येथील युवकाच्या मृत्यू प्रकरणात सहभागी असलेल्या आरोपींना तत्काळ अटक करा, या मागणीसाठी त्याचा मृतदेह नातेवाईकांनी व दलित संघटनांनी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर ठेवून आंदोलन केले होते. याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पो.नि. दयानंद गावडे यांनी काल आश्‍वासन दिले होते की, ‘‘ट्रॅक्टर मालकाची चौकशी करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मयतावर वाळूची चोरटी वाहतूक करण्यात येत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची चौकशी सुरू आहे.’’

त्यानुसार आज पोलिसांनी वरील पाच जणांना अटक केली असून त्यांना 3 दिवसांची पलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र शेगाव दुमाला येथे गेल्या कित्येक वर्षापासून अशा प्रकारे अवैध वाळु उपसा बिनबोभाट चालत असताना प्रशासन गप्प का? हा प्रश्‍न येथे उपस्थित होतो. मागे पंढरपूर चे तहसिलदार श्री.गुरव यांच्यावर हल्ला करण्यापर्यंत वाळु माफियांची मजल गेलेली होती. हे प्रकरण ताजे असतानाच काल अवैध वाहतुकीचा एक बळी हकनाक गेल्याची घटना घडलेली आहे. यावरुनच प्रशासनाची वाळु माफियांवरची पकड सैल झाल्याचे स्पष्ट होत असून पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळु उपसा करणार्‍या अशा वाळु माफियांवर प्रशासन कडक कारवाई केंव्हा करणार? असा प्रश्‍न जनतेतून विचारला जात आहे.

********************

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com




Post a Comment

0 Comments