‘21 व्या शतकातील संगणकीय युगातही अहिल्याबाईचे समग्र जीवन चारित्र्य चिंतनिय - सौ.प्रविणा दयानंद गावडे
राजयोगिनी अहिल्यादेवी होळकर मागास महिला चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका सौ.सीमाताई परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दयानंद गावडे यांच्या सुविद्य पत्नी सौ.प्रविणा गावडे यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्षा सौ.साधना भोसले यांचे प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोकी अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमेचे पुजन झाले.
21 व्या शतकातील संगणकीय युगातही अहिल्याबाईचे समग्र जीवन चरित्र चिंतनीय आहे. क्षणिक भपकेबाज जयंतीपेक्षा अहिल्या अध्यासनाची स्थापना करून अहिल्येचा जीवन संदेश तरूण पिढीपर्यंत पोहचविणे अगत्याचे आहे असे भावपुर्ण उद्गार सौ.प्रविणा गावडे यांनी मार्गदर्शनपर भाषणात काढले. प्रमुख भगिनी पाहुण्यांचा सत्कार सौ.सुरेखा रूपनर, डॉ.सौ.आशा कारंडे, डॉ.सौ.शैला देवकते यांनी केला. यावेळी नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले व सौ.सीमाताई परिचारक यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
जयंतीच्या निमित्ताने उपनगरातील सौ.जयश्री पारखे, सौ.शांताताई हाके, सौ.रूपाली येळे, सौ.माया गावडे,
सौ.वर्षा काळे, संगीता काळे, सौ.सारिका येळे, सौ.शैलजा सलगर, प्रियांका उत्पात, सौ.स्मिता फत्तेपूरकर, सौ.सरोज येळे आदी महिला बहुसंखेने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे संयोजन ट्रस्टच्या अध्यक्षा कमलताई तोंडे व सौ.मीरा येळे यांनी केले. आभार श्रीमती जयश्री कर्हाडे यांनी मानले.











0 Comments