नरेंद्र मोदी म्हणजे एक झंझावात-खा.शरद बनसोडे

पंढरपूर (प्रतिनिधी) पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे एक झंझावात असून त्यांनी आपल्या हाती सत्ता आल्यानंतर वर्षभरात जे प्रभावी आणि तत्परतेने मोठमोठी कामे केली त्याला तोड नाही. असे मत खा.अ‍ॅड.शरद बनसोडे यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस सरकारने त्यांच्या 54 वर्षाच्या राजवटीत केवळ भ्रष्टाचाराने देश पोखरून काढला. तर पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्याचा प्रयत्न केला. याच बरोबर सबका साथ सबका विकास हाच दृष्टीकोन समोर ठेऊन मेक इन इंडिया, जनधन योजना, प्रधानमंत्री ठेव योजना ह्या सर्व योजनांचा केंद्रबिंदू सामान्यातला सामान्य माणूसच मानून आपली यशस्वी वाटचाल ठेवली आहे. सरकारचीही कामगीरी आशादायी असून, येत्या चार वर्षात सबंध देश भाजपा सरकारच्या कामावर खुश असेल असा विश्‍वास सोलापूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी व्यक्त केला.

 

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार येवून एक वर्षाचा कालवधी पूर्ण झाला आहे. या एक वर्षात मोदी सरकारने जनतेच्या हितरसाठी घेतलेल्या विविध निर्णयांची आणि योजनांनी माहिती देण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती भारतीय जनता पक्षाच्यावतीने सोमवार दि. 1 जून रोजी पंढरपूर शहरातील मुरारजी कानजी धर्मशाळेत जनकल्याण पर्व या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना खा. बनसोडे बोलत होते. व्यासपीठावर शहर भाजपाचे अध्यक्ष बादलसिंह ठाकूर, तालुका अध्यक्ष सय्यद मुलाणी, शिरिष कटेकर, मंगळवेढा भाजपाचे अध्यक्ष चव्हाण, सेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख महेश साठे, राजश्री लोंढे आदी उपस्थित होते.

 भाजपा सरकारने जनतेच्या विशेषतः सर्व सामान्यांच्या हिताच्या अनेक महत्तपूर्ण योजना अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये जनधन योजना, सुकन्या ठेव योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा अशा विविध योजनांचा समावेश आहे. भाजपा सरकारने यशस्वीपणे आपला कार्यकाळ पुर्ण केला असतानाही, विरोधी पक्ष सरकार सामान्यांचे नसून, व्यापार्‍यांचे आहे अशी टिका सरकारवर करत तोंड सुख घेत आहेत. परंतु, भाजपा सरकार सबका साथ सबका विकास हे ब्रिद घेऊनच आपली वाटचाल करत असून, शेतकर्‍यांच्या समस्या संर्दभातही सरकार गंभीर आहे. शेतकर्‍यां
चौकट
पंढरपूर-सोलापूर रेल्वे होणार
सोलापूर मतदारसंघाचे प्रश्‍न लोकसभेत मांडताना पंढरपूरला जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केला. पंढरपूर तालुक्यातील 17 गावांच्या रस्त्याच्या प्रश्‍नासाठी आवज उठवत, पंढरपूर-सोलापूर रेल्वे होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या रेल्वेसाठी रेल्वे मंत्रालयाकडून ग्रिन सिग्नल आला असून, सध्या सर्वेचे काम सुरू असल्याचे खा. बनसोडे यांनी यावेळी सांगितले. तसेच एका वर्षाच्या माझ्या खासदारकीच्या कार्यकाळात मी शंभर टक्के उपस्थित असून, लोकसभेमध्ये 45 तारांकीत तर 145 अतारांकित प्रश्‍न उपस्थित केले आहेत. असेही खा. बनसोडे यावेळी म्हणाले.
******************





Post a Comment

0 Comments