पंढरीतील अवैध व्यवसाय तातडीने बंध करा... भाजपाची गृहराज्यमंत्र्याकडे मागणी

 
पंढरपूर शहरात गेल्या काही महिन्यापासुन अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरु असुन भुवैकुंठ म्हणुन ओळखल्या जानार्‍या या पंढरी नगरीस त्यामुळे कलंक लागत आहे.तरी या शहरातील सर्व अवैध धंदे तातडीने बंद करावेत अशी मागणी गृहमंत्री राम शिंदे यांच्याकडे पंढरपूर तालुका भाजपाच्या वतीने एका निवेदनाद्वारे गृहराज्य मंत्री राम शिंदे यांच्याकडे केली आहे.

  गृजराज्यमंत्री राम शिंदे हे नुकतेच पंढरीत आले होते.यावेळी भाजपाचे तालुकाअध्यक्ष रसुल मुलाणी ,भारतीय जनता युवा मोर्चाचे सौदागर मोळक,शहराध्यक्ष बादलसिंह ठाकुर,रसुल मुलाणी यांच्यासह शहर व तालुका भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंढरीत सुरु असलेल्या जुगार अड्डे,मटका बुकी,हाथभट्टी दारु विक्री,वेश्या व्यवसाय,वाळु चोरी अशा अवैध व्यवसायांकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार या निवेदनाद्वारे गृहराज्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.  




 

 



Post a Comment

0 Comments