पंढरपूर लाईव्ह (श्रीराम आरकिले):- पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला येथे आज दि. 21 जुन 2015 रोजी पहाटेच्या सुमारास युवराज दंदाडे (वय अंदाजे 23) रा.शेगाव दुमाला हा युवक टॅ्रक्टर चालवत असताना खराब रस्त्यावर अचानक ट्रॅक्टर पलटी झाल्याने खाली पडला. त्याच्या मेंदुला मार लागुन तो जबर जखमी झाला होता. त्याला अपघातानंतर ग्रामस्थांनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात नोंद झालेली असून पुढील तपास स्थानीक बीट हवालदार करत आहेत.
या अपघातात दुर्दैवी अंत झालेला युवराज दंदाडे हा युवक विवाहीत होता. त्याच्या पश्चात पत्नी आणि 2 मुले आहेत. त्याच्या या दुर्दैवी मृत्युमुळे शेगाव दुमाला परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
*************************
जगाच्या कानाकोपर्यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...! पंढरपूर लाईव्ह च्या अॅन्ड्रॉईड अॅपचे 2.0 हे न्यु लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा... अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...! हे अॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!
0 Comments