मानवी कवटी- हाडे यासह टाचणी-लिंबू हळदी-कूंकू आढळले..! तालुक्यात खळबळ...!
पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी)
महाराष्ट्राची अध्यात्मीक नगरी म्हणून ओळख असलेल्या पंढरी नगरीच्या तहसिल कार्यालयाच्या आवारातच आज दि. 16 जुन 2015 रोजी सकाळी सकाळीच 9 ते सव्वा 9 वाजणेच्या सुमारास अमावस्येच्या दिवशी मानवी कवटी आणि हाडे यांच्या सोबतच टाचण्या, लिंबू, हळदी-कुंकू टाकलेले आढळले असून ऐन अमावस्येच्या दिवसाला तहसिल कार्यालयाच्या आवारात हा प्रकार घडल्यामुळे पंढरपूर शहर तालुक्यासह संपुर्ण पुरोगामी महाराष्ट्र या घटनेमुळे हादरला आहे.
अंधश्रध्देला तिलांजली देणार्या संत तुकाराम, एकनाथ, गाडगेबाबा यांच्या सह संतांची शिकवण जिथे पेरली गेली, उगवली सर्वमान्य झाली.. त्याच पंढरीत आज वरील कृत्य घडले... याबाबतची सविस्तर माहिती अशी की, आज दि. 16 जुन रोजी तहसिल कार्यालयातील सेतू मध्ये कार्यरत असलेले स्वानंद हनुमंत पवार हे सकाळी 9 ते सव्वा नऊ च्या दरम्यान तहसिल कार्यालयात आपले कर्तव्य बजावण्यास गेले असताना त्यांना तहसिल कार्यालयाच्या आवारात वरील प्रकार घडलेला आढळून आला. त्यानंतर तात्काळ त्यांनी पंढरपूर शहर पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. श्री. पवार यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्याकडे रितसर सदर घटनेबाबत अर्ज सादर केला. यानंतर शहर पोलिसांकडून सदर घटनेबाबत बाबत कारवाई करण्यात आली असून या घटनेबाबतचा पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे श्री.माने हे करत आहेत.
याबाबत सविस्तरपणे हा प्रकार जादुटोण्याचा आहे की आणखी काजी आहे म्हणून श्री.माने यांचेकडे पंढरपूर लाईव्ह कडून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, याबाबत तपास चालु असून अजून तरी कोणतीही माहिती मिळालेली नाही.
पंढरपूर शहरात ऐन अमावस्येच्या दिवशी ते पण तहसिल कार्यालयात घडलेल्या या घटनेमुळे शहरातील नागरिक संभ्रमीत अवस्थेत असून याबाबतचा सखोल तपास लवकरात लवकर व्हावा अशी अपेक्षा आहे.
0 Comments