पुणे: शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणं साखर कारखानदारांनी
पैसे द्यावे, या मागणीसाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं धरणं आंदोलन सुरु
झालं आहे. पुण्याच्या साखर संकुलासमोर खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हे आंदोलन सुरु आहे.
30 जूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणं पैसे द्यावे, अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे.
साखर कारखानदारांना केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजचे पैसे मिळाले
नसतील, तर बाजारपेठेतून पैसे उभारुन शेतकऱ्यांना त्यांचा हक्क द्यावा,
असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे.
जगाच्या कानाकोपर्यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/






0 Comments