मुंबई: अभिनेता वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या
एबीसीडी-2 या सिनेमाने पहिल्याच दिवशी छप्पर फाडके कमाई केली आहे.
'डान्स'वर आधारित असलेल्या या सिनेमाला चाहत्यांनी भरभरून पसंती दिल्याचं
पाहायलं मिळतं.
शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात या सिनेमाने 29 कोटी 30 लाख रुपयांचा
गल्ला जमवला आहे. महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच दिवशी या सिनेमाने 14 कोटी
30 लाख रुपयांची कमाई केली. या वर्षात 'ओपनिंग डे' ला इतकी कमाई करणार, हा
पहिलाच सिनेमा ठरला आहे.
चित्रपट समीक्षक आणि ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्श यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे.
यापूर्वी नुकत्याच येऊन गेलेल्या अक्षय कुमारच्या 'गब्बर इज बॅक' या
सिनेमाने दोन दिवसात 24.55 कोटी रुपये जमवले होते. मात्र आता ABCD 2 ने
त्याच्या पुढे मजल मारली आहे.
**********************
जगाच्या कानाकोपर्यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अॅन्ड्रॉईड अॅपचे 2.0 हे न्यु लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!
0 Comments