कारागृहातील कैद्याच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी

कारागृहातील कैद्याच्या मृत्यूची दंडाधिकारीय चौकशी
पंढरपूर-दि.05:-  जिल्हा कारागृह सोलापूर येथील कोठडीत आरोपी वैभव ऊर्फ भैया विष्णू गायकवाड वय 27  वर्षे रा.पोहरगांव ता.पंढरपूर यांचा मृत्यु झाला असून,त्यांच्या मृत्यूची दंडाधिकारीय  चौकशी करण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी सोलापूर यांनी  उपविभागीय दंडाधिकारी संजय तेली यांची चौकशी अधिकारी  म्हणून नेमणूक केली आहे.                                   
या मृत्यु चौकशीकामी कोणास लेखी अथवा तोंडी पुरावा नोंदवायचा असेल त्यांनी  उपविभागीय दंडाधिकारी , उपविभाग पंढरपूर  या ठिकाणी दि. 25 जून 2015  रोजीपर्यंत  कार्यालयीन वेळेत  सादर करावेत. तसेच या तारखेनंतर येणा-या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत असेही उपविभागीय  दंडाधिकारी  श्री.तेली यांनी कळविले आहे.




Post a Comment

0 Comments