पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी) श्रीविठ्ठल रुक्मिीणी मंदिरे समिती बरखास्त करण्याचे आदेश आज राज्य शासनाने दिलेले असून मंदिर समितीची सर्व सुत्रे सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्याकडे आलेली आहेत. नवी समिती अस्तित्वात येत नाही तोपर्यंत समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे व सदस्य म्हणून कार्य. अधि. श्री.कादबाने हे काम पहातील.
आज राज्य शासनाकडून दिल्या गेलेल्या आदेशामध्ये असे नमुद करण्यात आले आहे की, ‘‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुप्रशासनासाठी आणि नियंत्रणासाठी सध्या अस्तित्वात असलेली अस्थायी स्वरुपातील मंदिर समिती बरखास्त करण्यात येत आहे.’’
महाराष्ट्रातील सत्ता बदलानंतर ही समिती बदलणारच होती मात्र बर्याच दिवसांच्या उलट सुलट चर्चेनंतर ही समिती बरखास्त करण्यात आलेली आहे. कांही दिवसांपूर्वीच मंदिर समितीचे अध्यक्ष आण्णासाहेब डांगे यांनी आपल्यावर विविध स्तरातून नाहक वेगवेगळे आरोप होत असलेबद्दल नाराजी व्यक्त करत शासनाने ही समिती बरखास्त करावी अन्यथा आापण लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्या अनुषंगानेच शासनाने हा निर्णय घेतला असावा. समिती बरखास्तीनंतर मंदिर समितीचा सर्व कार्यभार सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे व कार्य.अधिकारी श्री. कादबाने यांचेकडे सोपवण्यात आला असून नुतन मंदिर समितीच्या अस्तित्वापर्यंत ही सुत्रे यांचेकडे रहाणार आहेत.
0 Comments