पंढरपूर लाईव्ह वृत्त:- श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती बरखास्त केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करुन या समितीची नुतन कार्यकारिणी बनवत असताना शासनाने यामध्ये फेररचना करताना कांही आवश्यक बाबींचा समावेश करावा असा प्रस्ताव येथील सामाजिक कार्यकर्त्या रत्नप्रभा पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणविस यांच्या समोर एका पत्राद्वारे मांडला आहे. मंदिर समितीच्या नुतन फेेरचनेमध्ये 50% महिला असाव्यात ही मागणी प्रामुख्याने या प्रस्तावामध्ये आढळते.
सौ.पाटील यांनी पाठविलेल्या या पत्रामध्ये नमुद केलेल्या महत्वाच्या बाबी पुढील प्रमाणे आहेत. समितीच्या
स्थायी पदाधिकार्यांमध्ये अध्यक्ष हे पंढरपूर सत्र न्यायालयाचे न्यायाधीश असावेत, कार्याध्यक्षपदी स्वतंत्र आय.ए.एस. अधिखारी असावेत, सचिव पदी पंढरपूर चे तहसिलदार असावेत, सदस्यपदी उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर उपविभाग, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पंढरपूर रेल्वे चे प्रबंधक, पंढरपूर एस.टी. आगारप्रमुख हे असावेत. अस्थायी समितीचे पदाधिकार्यांमध्ये अध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी चे असावेत, उपाध्यक्षपदी तुकाराम महाराज संस्थान देहु चे असावेत, सदस्यपदी गजानन महाराज देवस्थान शेगाव, मुक्ताबाई संस्थान मुक्ताई नगर, एकनाथ महाराज संस्थान पैठण, सोपानकाका संस्थान सासवड, निवृत्तीनाथ संस्थान त्र्यंबकेश्वर अशा प्रकारे अस्थायी समितीत वरील संस्थांमधुन प्रत्येकी एक सदस्य घ्यावा, दर दोन वर्षांनी सदस्य बदलावा, सदस्य वारकरी असावा तसेच यामध्ये 50 टक्के महिला सदस्य असाव्यात अशा आशयाचे पत्र रत्नप्रभा पाटील यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला नुकतेच पाठविले आहे.






0 Comments